A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

नंदगोपाल फाऊंडेशन, जिल्हा सामान्य रुग्णालय व सुनंदा नर्सिंग कॉलेज भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन भंडारा, झाडे लावा झाडे जगवा उपक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.

नंदगोपाल फाऊंडेशन, जिल्हा सामान्य रुग्णालय व सुनंदा नर्सिंग कॉलेज भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन भंडारा, झाडे लावा झाडे जगवा उपक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.

              प्रेस विज्ञप्ति   
     नंदगोपाल फाऊंडेशन, जिल्हा सामान्य रुग्णालय                                     
         व सुनंदा नर्सिंग कॉलेज, भंडारा

       जिल्हा सामान्य रुग्णालयात वृक्षारोपण 

भंडारा:- नंदगोपाल फाऊंडेशन, जिल्हा सामान्य रुग्णालय व सुनंदा नर्सिंग कॉलेज भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन भंडारा, झाडे लावा झाडे जगवा उपक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
वृक्षारोपण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. अतुल टेंभुर्णे, वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. भारत लांजेवार, डॉ. प्रदीप मेघरे, IMA सचिव दुर्गेश पशिने, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तथा नंदगोपाल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार उपस्थित होते.
‘माझे बाळ माझे झाड’ संकल्पनेवर आधारित वृक्षारोपण कार्यक्रमात दोन ते तीन वर्षाचे उंच झाडांचे वृक्षारोपण करून त्याला संरक्षण करण्यासाठी पी. व्हि. सी पाईप चे कटघरे लावण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचे महत्व आहे असा विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक विलास केजरकर व प्रास्ताविक नंदगोपाल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुंदरलाल मेघवानी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ॲड. वसुधा मेघरे, मुन्ना ठाकूर, रवि सोनवाणे, सुहानी फुलबांधे, राहुल मेश्राम, राजेश मडामे, हेमराज ठाकरे, समीर नवाज, विवेक चटप, सरीन भोयर, ओमप्रकाश लांजेवार, मनोज लांजेवार, श्रृती देवगडे, मयुरी भोयर, आचल डोंगरे, प्रौर्णिमा आतीलकर, महंत चवरे, आचल राऊत, हेमलता पंचभाई, निकीता वाहणे, विना खरे, हर्षदा कुंभारे, भोजराज गौतम, सुंदरलाल मेघवानी, मंगेश शिवणकर, समीर लांजेवार, दिनेश हरडे, माधव वडनेरकर, मुजाहिद चौहान, अनोद साठवणे, अमित साकुरे, मोहन भाकरे व नंदगोपाल फाउंडेशनचे सदस्य, सुनंदा नर्सिंग कॉलेज भंडाराच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

 Vande bharat live tv news,nagpur 
             Editor 
 Indian Council of press,Nagpur
           Journalist

Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!