
प्रेस नोट
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, भंडारा व जाणता राजा कुस्ती स्पोर्ट अकॅडमी, भंडारा
जिल्ह्यातील कुस्ती खेळाडूंनी नाव लौकिक करावे - आकाश गायकवाड
नि:शुल्क कुस्ती प्रशिक्षण शिबिर यशस्वी
भंडारा:- प्रत्येक खेळाडूंनी आप आपल्या खेळाचे योग्य प्रशिक्षण घेऊन मिळालेल्या संधीचे सोने करण्याकरिता सातत्याने प्रयत्न करावे. ज्याप्रमाणे प्रतिकुल परिस्थितीवर मात करून कुस्ती पट्टू स्व. खाशाबा जाधव यांनी देशाच्या पातळीवर भारताचे नाव लौकिक केले आहे. त्यांचा आदर्श घेऊन घ्यावे. व जिल्ह्यातील कुस्ती खेळाडूंनी नाव लौकिक करावे असे प्रतिपादन क्रीडा अधिकारी आकाश गायकवाड यांनी केले.
ते क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, भंडारा व जाणता राजा कुस्ती स्पोर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे प्रमाणपत्र वितरण करतांना बोलत होते.
सदर कुस्ती प्रशिक्षण शिबिर क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते व जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आहे. प्रमाणपत्र वितरण क्रीडा अधिकारी आकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुस्ती वस्ताद रामनरेश सिंह ठाकुर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, कुस्ती प्रशिक्षक अशोक बन्सोड, समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक समीर नवाज, कुस्ती मार्गदर्शक विलास केजरकर, लिपिक राजेंद्र सावरबांधे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुस्ती प्रशिक्षण शिबिरार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी ऑलिपीकवीर स्व. खाशाबा जाधव यांची जिवनगाथा व त्यांनी कुस्ती क्रीडा क्षेत्रात केलेल्या योगदानाबाबत आणि ग्रिष्मकालीन कुस्ती प्रशिक्षण शिबिराच्या महत्त्वाकांक्षी विषयावर खेळाडूंना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विलास केजरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार समीर नवाज यांनी मानले.
प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेकरीता कल्याणी करवाडे, पल्लवी सिहोरे, वैशाली बशिने, ईशा शिवणकर, आरती कडव, श्वेता दमाहे, पायल बुध्दे, हितेशी चौधरी, प्रांजली मोदनकार, पायल गौतम, महिमा तितीरमारे, मयुरी शिंदे, दिक्षा झंझाळ, दिव्या सुर्यवंशी, गायत्री सार्वे, सुरज लेंडे, अतुल गजभिये, देशकर, तसेच क्रीडा क्षेत्रात भाग घेणाऱ्या खेळाडू विद्यार्थी -विद्यार्थिनींनी सहकार्य केले.
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015














