
संजय पारधी चंद्रपुर
चंद्रपुर :योग नृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपुर चे जनक भाई श्री गोपाल जी मुधंडा यांचे मार्गदर्शनात पोलीस मुख्यालय फुटबॉल ग्राउंड केंद्र.मित्र परिवार ग्रुप. व मानवाधिकार सहायता संघ भारत चे जिल्हा अध्यक्ष अशोक पडगीलवार यांचे नेतृत्वात वृध्दाश्रम येथे फळे नाश्ता मिठाई व आईस्क्रीम चे वाटप करण्यात आले मुलांना जन्म देऊन त्यांच पालनपोषण शिक्षण देऊन वाढविले घडविले वाढविले त्यांनीच आईवडीलांना बाहेर चा रस्ता दाखवावा ही समाजा साठी लाजिरवाणी बाब आहे वृध्दाना नातवंडांसोबत खेळायचे दिवस असतांना तो अधिकार झुगारून शेवटी वृध्दाश्रमात दिवस काढावे लागते ही शोकांतिका आहे सदर कार्यक्रमाचे आयोजनस्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी घेण्यात आला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सादरा करीत असताना ज्येष्ठ नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घालाघालणे ही एक दुखत बाब आहे तसेच आई-वडिलांचे गीत गाऊन त्यांच्या भावनांना उजाळा देत व त्यांचे सात्वन करण्यासाठी तशीच त्यांच्या दुःखावर पांघरून टाकण्यासाठी अशोक पडगिलवार यांनी मनोगतातून असे मत व्यक्त केले विठ्ठल देशमुख, सुधीर वानखेडे केंद्रप्रमुख निशाताई राजपूत यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं राधा देवगिरकर, अर्चना टेवरे, नीता नागतुरे, संगीता जुनघरे इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले चाय नाश्ता खाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.