A2Z सभी खबर सभी जिले की

विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर कार्यक्षेत्र नागपूर

[27/09, 9:52 pm] Devashish Tokekar: *प्रसिद्धी पत्रक*
*विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर* कार्यक्षेत्र नागपूर , भंडारा, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया,वर्धा येथील सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.45 वाजता संताजी सभागृह, बुधवार बाजार, सोमवारी पेठ, नागपूर येथे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.नितीन कहले यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा जिल्हा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित चे माजी अध्यक्ष खुशरंग नागफासे होते. यावेळी दिपप्रज्वलन करण्यात आले. स्टेजवर मा. अध्यक्ष तथा प्रमुख पाहुणे व संस्थेचे पदाधिकारी व संचालक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सौ.कठाणे मॅडम यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्ताने सहकार गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. देशातील पहलगाम- काश्मीर येथे शहीद झालेल्या नागरिकांना व देशाच्या सिमेवर लढताना शहीद झालेल्या सैनिकांना व नागरिकांना तसेच संस्थेच्या मृत सभासदांना दोन मिनिट उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मेघा करारे कोषाध्यक्ष यांनी मागील सभेचे कार्यवृत्त वाचण्यात आले यामध्ये कोणताही बदल न करता सर्वानुमते सभागृहा मध्ये मंजूरी दिली. यानंतर मानद सचिव नानाभाऊ महल्ले यांनी सभागृहाला विचारले की, विषयसुची नुसार विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मानद सचिव नानाभाऊ महल्ले यांनी दिले. यावेळी सभागृहा मधून लाभांश 8% करण्यात यावे असा आवाज आला आणि सचिव यांनी पदाधिकारी व संचालक यांचेशी विचारविनिमय करून 8% घोषित करण्यात आले. सभागृहात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे पुराव्यासह देण्यात आली.यावेळी संस्थेचे सहसचिव सुरेशगिर रिघनार्थी,मोनिका कायरकर, इंजि.श्याम वैघ, अविनाश हर्षें, सतिश भोयर, गणेश गडेकर, गिरीश दाभेकर, राजेंद्र देशमुख, मुकेश खराबे,मेघा करारे, रंजना चौरागडे, माधव वडनेरकर, शंकर येलोरे, नितीन सोमकुंवर, यशवंत कडू, इंजि. संजय खोंडे हे उपस्थित होते. यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेत जवळपास 2000 सभासदांची नोंदणी करण्यात आली. यावेळी सर्वच सभासदांना रू.500/- वाहतूक भत्ता वाटप करण्यात आले. सर्वांनी राष्ट्रगीत म्हणून सभा समाप्त झाल्याचे अध्यक्ष यांनी घोषित केले व सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करून सभा समाप्त झाल्याचे जाहिर केले.
आपला विश्वासू नानाभाऊ महल्ले मानद सचिव

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!