A2Z सभी खबर सभी जिले की

राज्यस्तरीय स्पर्धेत मुकेश व भाविक सुवर्ण पदकाचे मानकरी 

वेस्ट झोन नॅशनल स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

 

          :- दिनांक 20 ते 22 फरवरी 2026 या कालावधीत नाशिक येथे (UWW) युनाइटेड वर्ल्ड रेसलिंग, ग्रैपलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व ग्रैपलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांचा मान्यतेने नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय स्वराज्य कप स्पर्धेत ग्रैपलिंग (कुस्ती) या खेळामध्ये स्थानिक पैंथर्स स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू सीनियर वयोगट मध्ये भाविक तेजराज कुडवे 54 किलो व मुकेश भीमसेन पांडे 66 किलो वजन गटात आपले उत्कृष्ट प्रदर्शन करून चंद्रपूर जिल्ह्याला सुवर्ण पदकाचे मानकरी ठरवले. भाविक कुडवे यांनी नागपूरचे कृणाल सोबत झालेल्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन दाखवून विजय मिळविला. तसेच मुकेश पांडे यांनी मुंबई तसेच मध्ये नाशिकच्या मायकल फर्नांडिस यांच्यासोबत झालेल्या अंतिम सामन्यात आपली विजयी परंपरा कायम ठेवली व सुवर्ण पदकावर आपले नाव निश्चित केले. दोन्ही खेळाडू हे चंद्रपूर जिल्ह्याचे बरेचदा प्रतिनिधित्व केलेले आहे तसेच मुकेश पांडे हे राष्ट्रीय स्तरावर खूपदा पदकाची कमाई केलेली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेली आहे. ग्रैपलिंग हा खेळ कुस्ती या खेळाच्या सोबतच्या आहे तसेच हा खेळ स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत शालेय स्पर्धेत समाविष्ट आहे तसेच पैंथर्स स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू जानेवारी महिन्यात नाशिक येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय ग्रैपलिंग स्पर्धेत एकूण १२ पदके पटकवले तसेच त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागाला प्रथमच सर्वसाधारण चॅम्पियनशिप याचे पण मानकरी ठरले. पैंथर्स स्पोर्ट्स अकॅडमी हे नियमित सरावाच्या आणि जिद्द मुले चंद्रपूर जिल्ह्याला तसेच महाराष्ट्राला पदक प्राप्त करणारे खेळाडू बनवून दिलेले आहे त्याचबरोबर इथं वेगवेगळे मार्शल आर्ट स्पोर्ट्स खेळल्या जातात. त्याचबरोबर विजय खेळाडू यांनी आपले विजयाचे श्रेय आपल्या आई-वडील तसेच त्यांची मार्गदर्शक कोच हे मुकेश पांडे यांना दिले आहे. त्याचबरोबर सर्व पदाधिकारी व सचिव श्री उमेश पंधरे यांनी विजय खेळाडूंची खूप खूप अभिनंदन केले. त्याचबरोबर एप्रिल महिन्यामध्ये दमन व दीप इथे होणाऱ्या वेस्ट झोन नॅशनल साठी आपली जागा निश्चित केली तसेच दोन्ही खेळाडू त्या नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या प्रतिनिधित्व करणार यासाठी सर्व सहकारी मित्र व अकॅडमीचे बाकीचे सहयोगी यांनी खूप खूप अभिनंदन केले.

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!