
संजय पारधी
चंद्रपूर : श्री महर्षी विद्या मंदिर, दाताला येथील विद्यार्थ्यांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात मराठी राजभाषा दिवस साजरा केला. श्री महर्षी विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रीय संस्कृती आणि मराठी भाषेचा प्रसार करणे हा या उत्सवाचा मुख्य उद्देश होता. प्रसिद्ध कवी आणि लेखक कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. पूर्वा पुराणिक यांनी या दिवसाचे महत्त्व विशद केले आणि कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकल नृत्य, सामूहिक नृत्य, काव्यवाचन, पोवाडा सादरीकरण आणि ‘मोबाईल फोनचा वापर’ या संकल्पनेवर आधारित नाटकाचा समावेश होता.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका श्रीलक्ष्मी मूर्ती, उपमुख्याध्यापिका निशा मेहता, अनुराधा भांदक्कर, निखत खान, कविता आंबेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मृणाल लिंगे, अर्चना श्रीखंडे, वैशाली इंगोले, पूर्वा पुराणिक, नीलिमा जोगी, मंजू सोमलकर या मराठी विभागाच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्रीडा शिक्षक, कला शिक्षक गणेश सर, नम्रता शिक्षिका यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना श्रीखंडे आणि वैशाली पांडे यांनी केले. मंजू सोमलकर यांनी आभार मानले.
गुरुकुल शिक्षा संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक, सचिव श्री. दत्तात्रय कंचर्लावार आणि सर्व व्यवस्थापन सदस्यांनी मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.




