Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Yavatmal

ओबीसी कॉलम नाही तर जनगणना नाही!” OBC महामोर्चा व जनगणना समितीचा केंद्र सरकारला थेट निर्वाणीचा इशारा

02 Sep 2026, 04:27 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
ओबीसी कॉलम नाही तर जनगणना नाही!” OBC महामोर्चा व जनगणना समितीचा केंद्र सरकारला थेट निर्वाणीचा इशारा - यवतमाळ, महाराष्ट्र

वणी : आगामी जनगणनेत ओबीसी (VJ, NT, SBC) समाजाची जातनिहाय अचूक नोंद व्हावी, यासाठी स्वतंत्र ओबीसी कॉलम तसेच संगणकीय ‘ड्रॉप-डाऊन मेन्यू’ लागू करावा, अशी जोरदार मागणी सकल ओबीसी महामोर्चा व ओबीसी (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.

२०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत जात नोंदणीसाठी ओपन-एंडेड पद्धतीचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे जाती-पोटजातींच्या मोठ्या प्रमाणात नोंदी झाल्या. उच्चार, स्पेलिंग तसेच स्थानिक नावांमधील फरकामुळे उपलब्ध आकडेवारीच्या अचूकतेवर परिणाम झाल्याचा दावा महामोर्चाने केला आहे.

यावेळी ही पद्धत टाळून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींप्रमाणेच ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. केंद्रीय व राज्यस्तरीय मागासवर्गीय याद्यांच्या आधारे संगणकीय ‘ड्रॉप-डाऊन यादी’ तयार केल्यास जातनिहाय आकडेवारी अधिक अचूकपणे संकलित होऊ शकते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध न झाल्यास समाजाची वास्तविक लोकसंख्या तसेच सामाजिक व आर्थिक स्थिती स्पष्टपणे समोर येणार नाही. परिणामी शिक्षण, रोजगार, आरक्षण आणि अर्थसंकल्पीय तरतुदींच्या धोरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचा आक्षेप महामोर्चाने नोंदविला.

केंद्र सरकारने जनगणनेच्या प्रश्नावलीत तातडीने आवश्यक बदल करून SC व ST प्रमाणे ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम आणि ‘ड्रॉप-डाऊन मेन्यू’ लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास १ सप्टेंबरपासून देशव्यापी तीव्र आंदोलन छेडून आगामी जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सकल ओबीसी महामोर्चा व OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना समिती, वणी, मारेगाव, झरी, जि. यवतमाळ यांच्या वतीने देण्यात आला आहे.

निवेदनाच्या प्रती केंद्रीय गृहमंत्री, जनगणना आयुक्त, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री तसेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.

यावेळी प्रदीप बोनगिरवार, प्रा. विजय बोबडे, राजू पिंपळकर, प्रा. नितीन मोहितकर, प्रभाकर मोहितकर, सुभाष वैद्य, गुलाबराव वांढरे, पुंडलिकराव मोहितकर, पांडुरंग पंडिले, गजानन चंदावार, सुरेश राजूरकर, अजय चन्ने, किशोर ओचावार, श्यामराव घुमे, सुधीर थेरे, शरद ठाकरे, डॉ. उत्तम पावडे, भालचंद्र मोहितकर, वैभव डंभारे, गजेंद्र भोयर, मोहन डोंगे, नत्थू चहांदकर, राकेश भोयर, नारायण मांडवकर, दिवाकर नरुले, कृष्णदेव विधाते, श्याम ठाकरे, कैलास मेश्राम, अनिल तेलंग, नामदेवराव जेणेकर, अनिकेत बदखल, रामभाऊ खिरटकर, सतीश वराटे, रमेश येरणे, अनिल जांभुळकर यांच्यासह बहुसंख्य ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Jaipur13 Sep

राधा दामोदर मंदिर धौला में दो घंटे की रामधुन, वाद्य यंत्रों की धुन पर थिरके श्रद्धालु

राधा दामोदर मंदिर धौला में दो घंटे की रामधुन, वाद्य यंत्रों की धुन पर थिरके श्रद्धालु जयपुर। धौला…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Jaipur13 Sep

राधा दामोदर मंदिर धौला में दो घंटे की रामधुन, वाद्य यंत्रों की धुन पर थिरके श्रद्धालु

राधा दामोदर मंदिर धौला में दो घंटे की रामधुन, वाद्य यंत्रों की धुन पर थिरके श्रद्धालु जयपुर। धौला…

पूरी खबर पढ़ें →
महा-लापरवाही: बिरसिंहपुर नगर परिषद की बड़ी लापरवाही; वार्ड 10 के खेल मैदान के सामने बना दिया ‘कचरा घर’विशेष
Satna13 Sep

महा-लापरवाही: बिरसिंहपुर नगर परिषद की बड़ी लापरवाही; वार्ड 10 के खेल मैदान के सामने बना दिया ‘कचरा घर’विशेष

रिपोर्ट : प्रवीण कुमार प्रजापति (संवाददाता)ब्यूरो रिपोर्ट: बिरसिंहपुर, मध्य प्रदेश स्वच्छता अभियान के दावों की खुली पोल! एक…

पूरी खबर पढ़ें →
🚨17 करोड़ की सड़क एक बारिश में हुई बेहाल, जगह-जगह धंसी और उखड़ी परतें* *सामरी–कुसमी 17 किमी मार्ग की गुणवत्ता पर उठे सवाल, गड्ढों ने खोली निर्माण की पोल;
error: Content is protected !!