जवळके स पिण्याचे पाणी प्रश्न सोडवणारे कर्जत प्रांत नितीनजी पाटील यांचे ग्रामस्थांकडून कौतुक
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


जवळके (स) गावातील पाणीटंचाईच्या समस्येवर कर्जत प्रांत अधिकारी नितीनजी पाटील यांच्या कर्तव्यदक्षपणाचे ग्रामस्थांकडून कौतुक, प्रस्ताव मंजूर झाल्याने तात्काळ पाणी टँकर सुविधा सुरू! जामखेड तालुक्यातील जवळके स ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येची दखल घेत, वन्दे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज आणि समृद्ध भारतचे ब्युरो चिफ, निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष पुणे तथा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य विशाल बाळासाहेब अडागळे यांनी प्रशासनाकडे माहिती मिळताच केला पाठपुरावा.
जामखेड तहसीलदार शितलकुमार सवाळे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, कर्जत प्रांत अधिकारी नितीनजी पाटील, प्रथम नागरिक जवळके सुभाषदादा माने, ग्रामसेवक सचिन मोकाशी, महसूल अधिकारी शिरसाट, आकाश काशीकेदार आणि असिफ सय्यद यांच्या सहकार्याने अवघ्या एका दिवसात पिण्याचे पाणी टँकरचा प्रश्न मार्गी लागला. आज, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ०८:०० वाजता दोन पाण्याचे टँकर जवळके गावात पाठवण्यात आले असून, शासकीय विहिरीमध्ये पाणी सोडण्यात आले.
यानंतर पाणीटंचाई या गंभीर परिस्थितीमुळे जवळके गावात दररोज पाणी टँकरची सुविधा सुरू राहणार आहे. या गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नावर तात्काळ दखल घेऊन पाणी टँकर सुविधा सुरू झाल्याबद्दल जवळके (स) ग्रामस्थांनी सहकार्य करणारे कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी व पत्रकार विशाल बाळासाहेब अडागळे यांचे आभार मानले आहेत.
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

चंद्रपुर से वंदे भारत LIVE TV NEWS के लिए ब्यूरो चीफ समीर वानखेड़े की रिपोर्ट* चंद्रपुर के प्राचीन…
पूरी खबर पढ़ें →
दिन में ट्यूबवेलों की रेकी और रात में चोरी का खेल, सेंटरों कार, बाइक, रेहड़े और भारी मात्रा…
पूरी खबर पढ़ें →
भाद्रपद मास शुक्ल पक्ष चतुर्थी तिथि पर प्रतिवर्ष श्री गणेश चतुर्थी मनाई जाती है। श्री गणेश चतुर्थी के…
पूरी खबर पढ़ें →
🔥 हरलीन कौर की तहरीर पर इंदिरापुरम थाने में FIR No. 0754/2026 — अक्कू पंडित, सौरभ पंडित, दक्ष…
पूरी खबर पढ़ें →
१ हजार कोटींच्या ठेवी; १,८०० कोटींचा व्यवसाय | सलग तिसऱ्या वर्षी शून्य टक्के एनपीए; सभासदांना १० टक्के लाभांश…
पूरी खबर पढ़ें →
लोणी प्रतिनिधी (शहाजी दिघे ): कृत्रिम बुद्धिमत्ता आजच्या युगातील प्रभावी आणि स्मार्ट सहायक ठरत असली, तरी मानवी भावना,…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।