Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Ahmednagar

अहिल्यानगरच्या औद्योगिक क्रांतीत प्रवरा बँकेने उतरावे : ना. राधाकृष्ण विखे पाटील

14 Sep 2026, 11:18 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
अहिल्यानगरच्या औद्योगिक क्रांतीत प्रवरा बँकेने उतरावे : ना. राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर, महाराष्ट्र

१ हजार कोटींच्या ठेवी; १,८०० कोटींचा व्यवसाय | सलग तिसऱ्या वर्षी शून्य टक्के एनपीए; सभासदांना १० टक्के लाभांश

सोनगाव , प्रतिनिधी (शहाजी दिघे ): अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत असून, आगामी काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. या औद्योगिक विस्ताराला आर्थिक बळ देण्यासाठी प्रवरा सहकारी बँकेने उद्योगविश्वाशी आर्थिक संबंध अधिक दृढ करून कर्जपुरवठ्याची भूमिका व्यापक करावी, असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

प्रवरा सहकारी बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर राठी, प्रवरा फळे-भाजीपाला सोसायटीचे चेअरमन मकरंद गुणे, व्हाईस चेअरमन मच्छिंद्र थेटे, सोपानराव शिरसाठ, विजयराव लगड, शांतीनाथ आहेर, सहकारी संस्थांचे सहनिबंधक नामदेव ठोंबळ, बँकेचे व्यवस्थापक सौरभ बालोटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, शिर्डीसह हरेगाव, बेलवंडी, अहिल्यानगर आणि राहुरी परिसरात औद्योगिक वसाहतींसाठी जागा उपलब्ध होत आहे. अनेक उद्योजक गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत. या उद्योगांना वेळेत आर्थिक पाठबळ मिळाले, तर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे बँकेने केवळ पारंपरिक व्यवसायापुरते मर्यादित न राहता नव्या उद्योगांच्या गरजा ओळखून कर्जपुरवठ्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

केवळ पाच हजार रुपयांच्या ठेवींवर सुरू झालेल्या प्रवरा बँकेने आज एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला असून, सुमारे १,८०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील हा प्रवास उल्लेखनीय असल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले.

सहकारी बँकिंग क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आता अपरिहार्य झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक सक्षम आणि गतिमान सेवा देतानाच व्यवसायवृद्धीलाही मोठी संधी आहे. केंद्र सरकारच्या सहकारविषयक धोरणामुळे सहकारी संस्थांना आधुनिक पद्धतीने विस्तार करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आर्थिक गैरव्यवहारांमुळे सहकारी बँकिंग क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना प्रवरा बँकेने पारदर्शक कारभाराची परंपरा कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षी शून्य टक्के एनपीए राखला, ही बाब बँकेच्या आर्थिक शिस्तीचे द्योतक असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

सभासदांच्या विश्वासाबद्दल समाधान व्यक्त करताना यंदा सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली. अण्णासाहेब म्हस्के पाटील आणि डॉ. भास्करराव खर्डे यांनीही मनोगत व्यक्त करून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग के सदस्य प्रियांक कानूनगो का सागर आगमन
Sagar14 Sep

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग के सदस्य प्रियांक कानूनगो का सागर आगमन

सागर।वंदे भारत लाइव टीवी न्यूज रिपोर्टर सुशील द्विवेदी 8225072664 * राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC), नई दिल्ली के…

पूरी खबर पढ़ें →
थाना लवकुश नगर पुलिस की बड़ी कार्यवाही वर्क फ्रॉम होम के नाम पर 12 लाख से अधिक की ऑनलाइन फ्रॉड में 2 आरोपी गिरफ्तार
Chhatarpur14 Sep

थाना लवकुश नगर पुलिस की बड़ी कार्यवाही वर्क फ्रॉम होम के नाम पर 12 लाख से अधिक की ऑनलाइन फ्रॉड में 2 आरोपी गिरफ्तार

लवकुशनगर/छतरपुर थाना लवकुशनगर पुलिस की बड़ी कार्यवाही वर्क फ्रॉम होम के नाम पर 12 लाख रुपये से अधिक…

पूरी खबर पढ़ें →
उसाचे उत्पादन वाढवा, पाण्याची जबाबदारी माझी : ना. राधाकृष्ण विखे पाटील
Ahmednagar14 Sep

उसाचे उत्पादन वाढवा, पाण्याची जबाबदारी माझी : ना. राधाकृष्ण विखे पाटील

सोनगाव ,प्रतिनिधी (शहाजी दिघे ) : सहकारी साखर कारखानदारीचे अर्थकारण भक्कम करण्यासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र आणि एकरी…

पूरी खबर पढ़ें →
साहित्याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल अधुरी : प्रो. सदानंद भोसले
Ahmednagar14 Sep

साहित्याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल अधुरी : प्रो. सदानंद भोसले

लोणी प्रतिनिधी (शहाजी दिघे ): कृत्रिम बुद्धिमत्ता आजच्या युगातील प्रभावी आणि स्मार्ट सहायक ठरत असली, तरी मानवी भावना,…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Satna14 Sep

*ब्रेकिंग न्यूज़: बिरसिंहपुर गैस एजेंसी पर उमड़ी उपभोक्ताओं की भारी भीड़*

बिरसिंहपुर (मध्य प्रदेश):तहसील मुख्यालय बिरसिंहपुर स्थित गैस एजेंसी पर आज सुबह से ही रसोई गैस के लिए उपभोक्ताओं…

पूरी खबर पढ़ें →
जयरामनगर में पुलिस की बड़ी कार्रवाई: 13 किलो गांजा जब्त, महिला समेत 4 तस्कर गिरफ्तार
Bilaspur14 Sep

जयरामनगर में पुलिस की बड़ी कार्रवाई: 13 किलो गांजा जब्त, महिला समेत 4 तस्कर गिरफ्तार

इमानुएल भारद्वाज की रिपोर्ट 🖊️🖊️🖊️🖊️ बिलासपुर। जिले में अवैध नशीले पदार्थों के कारोबार के खिलाफ पुलिस द्वारा लगातार…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!