Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Yavatmal

ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी वणीत २ ऑक्टोबरला एल्गार!

01 Oct 2026, 10:51 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी वणीत २ ऑक्टोबरला एल्गार! - यवतमाळ, महाराष्ट्र

वणी : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना अचूक व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी, तसेच आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय (OBC) समाजासाठी स्वतंत्र कॉलम आणि डिजिटल अर्जामध्ये स्वतंत्र ड्रॉप-डाऊन मेन्यू उपलब्ध करून देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना समिती, वणी-मारेगाव-झरीजामणी यांच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी वणी येथे भव्य शांततापूर्ण सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी, २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर, शिवतिर्थ, वणी येथे हा सत्याग्रह होणार आहे.

ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळावे, यासाठी तालुक्यातील नागरिक, युवक-युवती, महिला – पुरुष तसेच शासकीय- निमशासकीय कर्मचारी आणि विविध समाजघटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अचूक जातनिहाय आकडेवारीची मागणी :-
सन २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जात जनगणनेमध्ये जात नोंदणी खुल्या स्वरूपात झाल्यामुळे विविध प्रकारच्या नोंदी, स्पेलिंगच्या चुका आणि पोटजातींच्या नोंदी यामुळे मोठ्या प्रमाणात विसंगती निर्माण झाल्याचा मुद्दा समितीने उपस्थित केला आहे.

भविष्यातील जनगणनेमध्ये अशा त्रुटी टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अधिकृत OBC यादीनुसार स्वतंत्र डिजिटल ड्रॉप-डाऊन मेन्यूच्या माध्यमातून जात नोंदणी करण्यात यावी, अशी समितीची प्रमुख मागणी आहे. “जातनिहाय जनगणना — ओबीसींच्या अचूक संख्येसाठी आणि योग्य प्रतिनिधित्वासाठी आवश्यक” या भूमिकेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या सत्याग्रहात नागरिकांनी शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ओबीसी समाजाच्या या महत्त्वाच्या मागणीसाठी २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता शिवतिर्थ, वणी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून सत्याग्रहाला बळ द्यावे, असे आवाहन प्रदिप बोनगिरवार, मोहन हरडे, राजू पिंपळकर, गजानन चंदावर, जगदीश ढोके, मंगेश रासेकर, आशिष काळे, दिवाकर नरुले, रमेश येरणे, प्रवीण निकोडे, पांडुरंग पंडिले, काशिनाथ पचकटे, किशोर ओचावार, राजाभाऊ बोलोरिया, सुरेश बन्सोड, अजय चन्ने, अनिल आक्केवार, मोरेश्वर उज्वलकर, असिफ शेख, सिद्दीक रंगरेज, रईस कुरेशी, गणेश धानोरकर, महेश मुळेवार, विकास चांदवडकर, विजय माळीकर, गणेश लाड, राजेंद्र जयस्वाल, सुरेश मांडवकर, राहुल चौधरी, नितीन धाबेकर, डुडू नक्षिणे, संजय चिंचोलकर, पुरुषोत्तम नवघरे, प्रा. विनोद चव्हाण, आकाश अक्कलवार, दादाराव राऊत, कैलास पचारे, प्रमोद लोणारे, रवी सोनकुसरे, प्रदिप बोरकुटे, सुभाष वैद्य, पांडुरंग ताटेवार, संजय वाणी, सागर मुने, रवींद्र आंबटकर, शैलेश अडपावार, नारायण मांडवकर, अशोक चौधरी, नितीन मांदाडे, ॲड.

अमोल कळस्कर, विनोद किडीले, नंदुभाऊ गुरुकर, संतोष जयस्वाल, राजेश पहापळे, बंडू नींदेकर, किसन दूधलकर, अशोक अंकतवार इत्यादींनी केले आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

*विशेष लेख* २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त* *महात्मा गांधी : वन मॅन आर्मी*
Bhandara02 Oct

*विशेष लेख* २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त* *महात्मा गांधी : वन मॅन आर्मी*

*विशेष लेख* २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त* *महात्मा गांधी : वन मॅन आर्मी* महात्मा गांधींचे नाव घेतले की,…

पूरी खबर पढ़ें →
भाजपा सदर केंट मंडल ने मनाई गांधी एवं शास्त्री जयंती
Sagar02 Oct

भाजपा सदर केंट मंडल ने मनाई गांधी एवं शास्त्री जयंती

सागर।वंदे भारत लाइव टीवी न्यूज रिपोर्टर सुशील द्विवेदी 8225072664 * राष्ट्रपिता महात्मा गांधी जी एवं पूर्व प्रधानमंत्री स्व.…

पूरी खबर पढ़ें →
बड़ी खबर | सहारनपुर में अवैध हथियारों के गिरोह का बड़ा खुलासा, STF मेरठ और मिर्जापुर पुलिस की संयुक्त कार्रवाई
A2Z सभी खबर सभी जिले की02 Oct

बड़ी खबर | सहारनपुर में अवैध हथियारों के गिरोह का बड़ा खुलासा, STF मेरठ और मिर्जापुर पुलिस की संयुक्त कार्रवाई

# 🚨🔥 बड़ी खबर | सहारनपुर में अवैध हथियारों के गिरोह का बड़ा खुलासा, STF मेरठ और मिर्जापुर…

पूरी खबर पढ़ें →
प्रभारी मंत्री नागर सिंह चौहान का मानपुर में आत्मीय आगमन, /गुप्ता परिवार को दी बिटिया के जन्म की बधाई
Umaria02 Oct

प्रभारी मंत्री नागर सिंह चौहान का मानपुर में आत्मीय आगमन, /गुप्ता परिवार को दी बिटिया के जन्म की बधाई

उमरिया नौरोजाबाद से राहुल शीतलानी कि रिपोर्ट मध्यप्रदेश शासन के कैबिनेट मंत्री एवं उमरिया जिले के प्रभारी मंत्री…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!