Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Ahmednagar

अस्लम इनामदारचा लोणीत सन्मान; सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक

02 Oct 2026, 09:32 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
अस्लम इनामदारचा लोणीत सन्मान; सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक - अहमदनगर, महाराष्ट्र

आशियाई कबड्डीत महाराष्ट्राचा डंका; ग्रामीण मातीतून घडलेल्या खेळाडूच्या यशाचे पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून कौतुक

लोणी, प्रतिनिधी : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या कबड्डी मैदानावर सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावत अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राचा झेंडा उंचावणारा टाकळीभानचा भूमिपुत्र अस्लम इनामदार याचा लोणी येथे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत देशाच्या तिरंग्याला अभिमानाने उंचावणाऱ्या अस्लमच्या यशाचे विखे पाटील यांनी कौतुक करून त्याला विशेष शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील अस्लम इनामदार याने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळविला आहे. ग्रामीण भागातून आलेल्या या खेळाडूने आपल्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

याप्रसंगी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्यासह अस्लमचे नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

“सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर क्रीडा क्षेत्रात अस्लम इनामदार आणि त्याच्या संघाने भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. हे यश अहिल्यानगरच्या क्रीडा संस्कृतीचे, त्याच्या कुटुंबीयांचे आणि प्रशिक्षकांचे आहे. अहिल्यानगरचा हा भूमिपुत्र आशियाच्या मैदानावर इतिहास घडवतो, ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद घटना आहे,” असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आणि जिद्द मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्यांना योग्य संधी, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. शहर आणि ग्रामीण भागातील खेळाडूंमधील दरी कमी होत असून, योग्य सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील खेळाडू राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात. अस्लम इनामदारच्या यशाने ग्रामीण खेळाडूंमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे, असेही विखे पाटील यांनी नमूद केले.

अस्लमने यापूर्वी सुवर्णपदक मिळवल्यानंतर टाकळीभान येथे झालेल्या नागरी सत्कार सोहळ्याची आठवण सांगत, “यापूर्वी अस्लमला प्रथम सुवर्णपदक मिळाले तेव्हा टाकळीभान येथे झालेल्या नागरी सत्कार समारंभास आपण आवर्जून उपस्थित होतो,” असे पालकमंत्री म्हणाले.

अस्लम इनामदारच्या या यशामुळे जिल्ह्यातील कबड्डीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ग्रामीण मातीतून आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात पोहोचलेल्या या खेळाडूच्या जिद्दीची सर्वत्र चर्चा होत आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

खेत में सिंचाई के लिए मोटर चालू करते समय करंट की चपेट में आया किसान, मौत
Ghazipur19 Oct

खेत में सिंचाई के लिए मोटर चालू करते समय करंट की चपेट में आया किसान, मौत

जमानियां, गाजीपुर। जमानियां कोतवाली क्षेत्र के महेवा गांव में रविवार को बिजली का करंट लगने से 35 वर्षीय…

पूरी खबर पढ़ें →
धानोरा में महसूल विभाग की बड़ी कार्रवाई: 8 ट्रक और पोकलेन जब्त, उदेगाव रेती घाट पर अवैध उत्खनन पर शिकंजा
Gadchiroli19 Oct

धानोरा में महसूल विभाग की बड़ी कार्रवाई: 8 ट्रक और पोकलेन जब्त, उदेगाव रेती घाट पर अवैध उत्खनन पर शिकंजा

ब्युरो चीफ समीर वानखेड़े की रिपोर्ट: गढ़चिरौली जिले के धानोरा तालुका के उदेगाव रेती घाट पर अवैध रेती…

पूरी खबर पढ़ें →
सिंगरौली : जिले के खुटार पुलिस की कार्यवाही: अवैध रेत से लोड ट्रैक्टर-ट्रॉली जब्त।
Singrauli19 Oct

सिंगरौली : जिले के खुटार पुलिस की कार्यवाही: अवैध रेत से लोड ट्रैक्टर-ट्रॉली जब्त।

सिंगरौली : जिले के खुटार पुलिस की कार्यवाही: अवैध रेत से लोड ट्रैक्टर-ट्रॉली जब्त। (जिला ब्यूरो चीफ सिंगरौली…

पूरी खबर पढ़ें →
पाली से छगन भारद्वाज राष्ट्रीय मीडिया प्रभारी,की और से जोधपुर गौतम सभा के र्निविरोध र्निवाचित अध्यक्ष नरेश कुमार जाजडा, उपाध्यक्ष महेश सांखी, मंत्री रवि शर्मा सभी को हार्दिक बधाई।
Pali19 Oct

पाली से छगन भारद्वाज राष्ट्रीय मीडिया प्रभारी,की और से जोधपुर गौतम सभा के र्निविरोध र्निवाचित अध्यक्ष नरेश कुमार जाजडा, उपाध्यक्ष महेश सांखी, मंत्री रवि शर्मा सभी को हार्दिक बधाई।

पाली 19अकटुबंर। जोधपुर गौतम सभा के चुनाव संपन्न हुये।जिसमे गौतम सभा अध्यक्ष श्रीमान नरेश कुमार जी जाजडा,(र्निविरोध निर्वाचित)उपाध्यक्ष…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!