Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Ahmednagar

‘शाळेचे ऋण फेडण्याची वेळ आली !’ माजी विद्यार्थ्यांनी विद्यालय विकासासाठी पुढे यावे : रावसाहेब म्हस्के पाटील

02 Oct 2026, 09:32 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
ChatGPT Image Sep 17 2026 05 38 13 PM

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
आदर्श विद्यार्थी, स्पर्धा विजेते व देणगीदारांचा गौरव

कोल्हार प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (कला) महाविद्यालय, कोल्हार बुद्रुक येथे जयंती सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी आदर्श विद्यार्थी, विविध स्पर्धांतील विजेते तसेच विद्यालयाला आर्थिक व इतर स्वरूपात योगदान देणाऱ्या देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य रावसाहेब नाथाजी म्हस्के पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. संदीप वर्पे पाटील, नवनियुक्त जनरल बॉडी सदस्य किरण कडू पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष . ॲडसुरेंद्र खर्डे पाटील, उद्योजक प्रशांत कुठले पाटील, डॉ. शशिकांत काळे आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक अंकुशराज जामदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ शिक्षक शब्बीर शेख यांनी देणगीदार तसेच स्व. माधवराव खर्डे पाटील स्मृती स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर केली. इयत्ता दहावी मधील भक्ती संतोष रोकडे व सिद्धांत सतीश होले यांची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड करून गौरव करण्यात आला.
विद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी माजी विद्यार्थी उद्योजक प्रशांत कुठले पाटील यांनी पाच लाख रुपयांची देणगी देऊन सहकार्य केले. इमारतीसाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांची आवश्यकता असून शिक्षकांनीही सुमारे चार लाख रुपयांचे योगदान दिल्याचे ॲड.सुरेंद्र खर्डे पाटील यांनी सांगितले.
ॲड.संदीप वर्पे पाटील यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत आधुनिक कौशल्ये आत्मसात करून विविध क्षेत्रांत यश मिळवावे, असे आवाहन केले. रावसाहेब म्हस्के पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यालयाच्या विकासासाठी निधी उभारण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, सेवकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संग्राम गोपाळे, शब्बीर शेख व दीपक मगर यांनी केले. आभार सीताराम बोरुडे यांनी मानले.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

18 गांवों में नशामुक्ति की अलख, नरयावली विधानसभा में प्रेरकों का सम्मान, विधायक प्रदीप लारिया की पहल पर विधानसभा स्तरीय सम्मान समारोह
Sagar16 Oct

18 गांवों में नशामुक्ति की अलख, नरयावली विधानसभा में प्रेरकों का सम्मान, विधायक प्रदीप लारिया की पहल पर विधानसभा स्तरीय सम्मान समारोह

सागर।वंदे भारत लाइव टीवी न्यूज रिपोर्टर सुशील द्विवेदी 8225072664 * नशामुक्त समाज की शुरुआत केवल कानून से नहीं,…

पूरी खबर पढ़ें →
खोरी कला मे बंदरों का खूनी आतंक, महिला व बच्चों की सुरक्षा पर मंडराया खतरा, ग्रामीणों ने प्रशासन से लगाई गुहार
Nuh16 Oct

खोरी कला मे बंदरों का खूनी आतंक, महिला व बच्चों की सुरक्षा पर मंडराया खतरा, ग्रामीणों ने प्रशासन से लगाई गुहार

तावडू:खोरी कलां में बंदरों का खूनी आतंक, महिलाओं और बच्चों की सुरक्षा पर मंडराया खतरा, ग्रामीणों ने प्रशासन…

पूरी खबर पढ़ें →
चार महिलाओं की जान बचाने वाले दो साहसी बालकों को जिला पदाधिकारी गया ने प्रशस्ति पत्र देकर किया सम्मानित l
Gaya16 Oct

चार महिलाओं की जान बचाने वाले दो साहसी बालकों को जिला पदाधिकारी गया ने प्रशस्ति पत्र देकर किया सम्मानित l

प्रेस विज्ञप्ति **चार महिलाओं की जान बचाने वाले दो साहसी बालकों को जिला पदाधिकारी, गया ने प्रशस्ति-पत्र देकर…

पूरी खबर पढ़ें →
नवरात्रि सातवें दिन सप्तमी तिथि पर देवी कालरात्रि की पूजा आराधना की जाती है
Nagpur16 Oct

नवरात्रि सातवें दिन सप्तमी तिथि पर देवी कालरात्रि की पूजा आराधना की जाती है

धार्मिक आस्था रखने वालों के लिए शारदीय नवरात्रि का सातवां दिन, सप्तमी तिथि का बहुत महत्व रहता है,…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!