Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Ahmednagar

प्रयोगशील शेतीला यशाची मोहर; आसावा फार्मचा ऊस उत्पादनात प्रथम क्रमांक

02 Oct 2026, 09:32 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
प्रयोगशील शेतीला यशाची मोहर; आसावा फार्मचा ऊस उत्पादनात प्रथम क्रमांक - अहमदनगर, महाराष्ट्र

ऊस उत्पादन स्पर्धेत प्रथम क्रमांक; आधुनिक तंत्रज्ञानासह पर्यावरणपूरक शेतीचा आदर्श

सोनगाव प्रतिनिधी : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, अमृतनगर यांच्या २०२६-२७ गळीत हंगामातील ऊस उत्पादन स्पर्धेत चणेगाव येथील त्रिमूर्ती आसावा फार्मने सुरू ऊस उत्पादनात प्रथम क्रमांक पटकावला. गट क्रमांक २०२/१ मधील अवघ्या ८० आर क्षेत्रातून तब्बल १११.०८८ टन ऊस उत्पादन घेत उल्लेखनीय कामगिरी नोंदविण्यात आली.
शास्त्रीय पद्धतीने ऊस लागवड, संतुलित खत व्यवस्थापन, पाण्याचा कार्यक्षम वापर, जैविक व रासायनिक निविष्ठांचा संतुलित वापर आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हे उत्पादन साध्य झाले. ऊस विकास विभागाचे मुख्य शेतकी अधिकारी भाऊसाहेब खर्डे व ऊस विस्तार अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाचा या यशात महत्त्वाचा वाटा राहिला.
“आसावा यांचे कृषी, पर्यावरण संवर्धन, जलसाक्षरता आणि भूमी सुधारणा क्षेत्रातील प्रयोग ऊस शेतीसाठी दिशादर्शक आहेत. त्यांची प्रयोगशीलता आणि कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांनी केले.
डॉ. विठ्ठलदास बालकिसन आसावा यांनी शेतात बॅटरी पंपचलित ऊस बेणे प्रक्रिया, हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे, सायकल कोळपे, वनस्पतीजन्य अर्क, वर्मी-कम्पोस्ट, जलसंधारण तसेच ठिबक व तुषार सिंचनासह सौरऊर्जेचा वापर केला आहे. माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, आंतरपीक, हिरवळीचे खत, बीजप्रक्रिया, पीक फेरपालट, सापळा पिके व पक्षी थांबे अशा विविध प्रयोगांची ऊस विकास विभागाच्या अभ्यास गटाने पाहणी केली.
‘शेतात काडेपेटी न वापरण्याचा संकल्प’ करून पाचट व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचा पुनर्वापर करण्यावरही आसावा यांनी भर दिला आहे. कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी फार्म स्कूल, शेतकरी मेळावे, कृषी परिषदा, लेखन व ‘कृषी पंढरी आसावा ’ या माध्यमातून ते सातत्याने कार्यरत आहेत.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वार्षिक सर्वसाधारण सभेत लोकनेते बाळासाहेब थोरात, उपाध्यक्ष पांडुरंग घुले, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींच्या हस्ते त्रिमूर्ती आसावा फार्मचा गौरव करण्यात आला

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

शादीशुदा मामा ने भांजी से की शादीः युवती 19 साल तो युवक 30 का, मंदिर में रचाया ब्याह, कई साल से था प्यार
Amroha02 Oct

शादीशुदा मामा ने भांजी से की शादीः युवती 19 साल तो युवक 30 का, मंदिर में रचाया ब्याह, कई साल से था प्यार

अमरोहा के डिडौली कोतवाली क्षेत्र में 30 वर्षीय शादीशुदा मामा ने 19 वर्षीय भांजी से मंदिर में शादी…

पूरी खबर पढ़ें →
गांधी जयंती पर न्यायालय परिसर में गूंजा श्रमदान का संदेश प्रधान जिला न्यायाधीश श्री थॉमस एक्का, न्यायाधीशों, अधिवक्ताओं और न्यायिक कर्मचारियों ने थामा स्वच्छता का संकल्प
ग्राम सोहलपुर में विशेष जागरूकता कार्यक्रम आयोजित, जनता को नए आपराधिक कानूनों को लेकर किया गया जागरूक।
Haridwar02 Oct

ग्राम सोहलपुर में विशेष जागरूकता कार्यक्रम आयोजित, जनता को नए आपराधिक कानूनों को लेकर किया गया जागरूक।

फुरकान अंसारी। हरिद्वार। वरिष्ठ अधिकारियों के निर्देशानुसार आज कोतवाली कलियर पुलिस टीम द्वारा ग्राम सोहलपुर में एक विशेष…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!