Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Ahmednagar

सबका मालिक एक मार्केटमध्ये साईभक्तांसाठी लाडू प्रसाद काउंटर

02 Oct 2026, 09:32 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
सबका मालिक एक मार्केटमध्ये साईभक्तांसाठी लाडू प्रसाद काउंटर - अहमदनगर, महाराष्ट्र

नगर–मनमाड महामार्गालगत सुविधा; भाविकांचा वेळ वाचणार, प्रसाद खरेदीचा मार्ग सुकर

शिर्डी : शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेत आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने नगर–मनमाड महामार्गालगत नव्याने सुरू झालेल्या ‘सबका मालिक एक’ मार्केट परिसरात लाडू प्रसाद काउंटर सुरू करण्यात आला आहे. मुख्य रस्त्यालगतच प्रसाद उपलब्ध होणार असल्याने साईभक्तांना मंदिर परिसर किंवा प्रसादालयाकडे जाण्याची आवश्यकता न पडता सोयीने लाडू प्रसाद खरेदी करता येणार आहे.

श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या निर्देशानुसार ही सुविधा सुरू करण्यात आली. लाडू प्रसाद काउंटरचे औपचारिक उद्घाटन शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष अभय शेळके, सर्व नगरसेवक, श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, अतुल वाघ, लाडू प्रसाद निर्मिती विभाग प्रमुख रविंद्र गायके यांच्यासह नगरपरिषद व संस्थानचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

नगर–मनमाड महामार्गावरून शिर्डीत येणाऱ्या तसेच प्रसादालयाच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांसाठी ही सुविधा अत्यंत सोयीची ठरणार आहे. मुख्य रस्त्यालगतच प्रसाद काउंटर सुरू झाल्याने भाविकांचा वेळ वाचणार असून, दर्शन, प्रवास आणि प्रसाद खरेदी अधिक सुलभ होणार आहे.

साईबाबांचा प्रसाद भाविकांना सहज आणि वेळेत उपलब्ध व्हावा, हा या सुविधेमागील प्रमुख उद्देश आहे. मंदिर परिसरातील गर्दीचा विचार करता महामार्गालगत सुरू करण्यात आलेल्या या काउंटरमुळे भाविकांना अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला आहे. संस्थान आणि शिर्डी नगरपरिषद यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

भाविकांच्या सुविधेला प्राधान्य देत शिर्डीतील सेवा-सुविधांचा विस्तार करण्याच्या संस्थानच्या प्रयत्नांत या नव्या प्रसाद काउंटरची भर पडली आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

गांधी जयंती पर न्यायालय परिसर में गूंजा श्रमदान का संदेश प्रधान जिला न्यायाधीश श्री थॉमस एक्का, न्यायाधीशों, अधिवक्ताओं और न्यायिक कर्मचारियों ने थामा स्वच्छता का संकल्प
ग्राम सोहलपुर में विशेष जागरूकता कार्यक्रम आयोजित, जनता को नए आपराधिक कानूनों को लेकर किया गया जागरूक।
Haridwar02 Oct

ग्राम सोहलपुर में विशेष जागरूकता कार्यक्रम आयोजित, जनता को नए आपराधिक कानूनों को लेकर किया गया जागरूक।

फुरकान अंसारी। हरिद्वार। वरिष्ठ अधिकारियों के निर्देशानुसार आज कोतवाली कलियर पुलिस टीम द्वारा ग्राम सोहलपुर में एक विशेष…

पूरी खबर पढ़ें →
एस्ट्रो विलेज ज्ञानपुरा में एस्ट्रोनॉमी ट्रेनिंग का शुभारंभ ग्रामीण युवाओं को खगोल विज्ञान का प्रशिक्षण, रोजगार और एस्ट्रो-टूरिज्म को मिलेगा बढ़ावा
मेरा युवा भारत ने स्वच्छता अभियान और ग्राम सभा में ‘रिफॉर्म उत्सव’ के साथ सेवा पखवाड़े मनाया गया ग्रामवासियों और विद्यार्थियों ने स्वच्छता एवं सेवा का लिया संकल्प
तिरंगे के निचे ईलेक्शन कमिशन के धांदली के विरोध मे मुंबई दादर मे उठा जे-झी का सैलाब.!
Mumbai02 Oct

तिरंगे के निचे ईलेक्शन कमिशन के धांदली के विरोध मे मुंबई दादर मे उठा जे-झी का सैलाब.!

मुंबई:- अकोला प्रतिनिधी :-डॉ.पंजाबराव खाडे. तिरंगे के निचे ईलेक्शन कमिशन के धांदली के विरोध मे मुंबई दादर मे…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!