Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Ahmednagar

पायरेन्स आयबीएमएच्या चार विद्यार्थिनींची ‘एक्सेलआर’मध्ये निवड

02 Oct 2026, 09:32 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
ChatGPT Image Sep 17 2026 05 38 13 PM

फुलस्टॅक डेव्हलपर पदावर झेप; प्रत्येकी तीन लाखांचे वार्षिक पॅकेज

सोनगाव , प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या पायरेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन (आयबीएमए), लोणीच्या प्रयत्नांना यश आले आहे. संस्थेत एक्सेलआर कंपनीच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाइन रोजगार निवड प्रक्रियेत चार विद्यार्थिनींची फुलस्टॅक डेव्हलपर पदासाठी निवड झाली असून, प्रत्येकी तीन लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

संस्कृती शेलार, निशा नानावरे, प्रतीक्षा पुलाटे आणि भावना मालुसरे या विद्यार्थिनींनी निवड प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर उल्लेखनीय कामगिरी करत ही यशस्वी झेप घेतली. जावा तंत्रज्ञानावर आधारित फुलस्टॅक डेव्हलपर पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत बौद्धिक क्षमता चाचणी, समूह चर्चा तसेच वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या. या माध्यमातून विद्यार्थिनींचे तांत्रिक ज्ञान, तर्कशक्ती, संवादकौशल्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता तपासण्यात आली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता कमी नसून, त्यांना योग्य व्यासपीठ व मार्गदर्शन मिळाल्यास तेही स्पर्धात्मक रोजगार बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात, हे या निवडीमुळे अधोरेखित झाले आहे.

“विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ज्ञानाला कौशल्यांची आणि कौशल्यांना रोजगाराची जोड देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे,” असे पायरेन्स आयबीएमएचे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी सांगितले.

निवड झालेल्या विद्यार्थिनींनी संस्थेच्या शैक्षणिक वातावरणाबरोबरच मिळालेल्या मार्गदर्शन व प्रोत्साहनाबद्दल समाधान व्यक्त केले. “आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी असूनही संस्थेच्या माध्यमातून विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे विखे पाटील आणि सचिव डॉ. निलेश बनकर यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आमची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळाली. या यशाचा मोठा आनंद आहे,” अशी भावना विद्यार्थिनी प्रतीक्षा पुलाटे हिने व्यक्त केली.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विश्वस्त डॉ. सुप्रिया ढोकणे विखे पाटील, संस्थेचे सचिव व संचालक डॉ. निलेश बनकर आदींनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

गांधी जयंती पर न्यायालय परिसर में गूंजा श्रमदान का संदेश प्रधान जिला न्यायाधीश श्री थॉमस एक्का, न्यायाधीशों, अधिवक्ताओं और न्यायिक कर्मचारियों ने थामा स्वच्छता का संकल्प
ग्राम सोहलपुर में विशेष जागरूकता कार्यक्रम आयोजित, जनता को नए आपराधिक कानूनों को लेकर किया गया जागरूक।
Haridwar02 Oct

ग्राम सोहलपुर में विशेष जागरूकता कार्यक्रम आयोजित, जनता को नए आपराधिक कानूनों को लेकर किया गया जागरूक।

फुरकान अंसारी। हरिद्वार। वरिष्ठ अधिकारियों के निर्देशानुसार आज कोतवाली कलियर पुलिस टीम द्वारा ग्राम सोहलपुर में एक विशेष…

पूरी खबर पढ़ें →
एस्ट्रो विलेज ज्ञानपुरा में एस्ट्रोनॉमी ट्रेनिंग का शुभारंभ ग्रामीण युवाओं को खगोल विज्ञान का प्रशिक्षण, रोजगार और एस्ट्रो-टूरिज्म को मिलेगा बढ़ावा
मेरा युवा भारत ने स्वच्छता अभियान और ग्राम सभा में ‘रिफॉर्म उत्सव’ के साथ सेवा पखवाड़े मनाया गया ग्रामवासियों और विद्यार्थियों ने स्वच्छता एवं सेवा का लिया संकल्प
तिरंगे के निचे ईलेक्शन कमिशन के धांदली के विरोध मे मुंबई दादर मे उठा जे-झी का सैलाब.!
Mumbai02 Oct

तिरंगे के निचे ईलेक्शन कमिशन के धांदली के विरोध मे मुंबई दादर मे उठा जे-झी का सैलाब.!

मुंबई:- अकोला प्रतिनिधी :-डॉ.पंजाबराव खाडे. तिरंगे के निचे ईलेक्शन कमिशन के धांदली के विरोध मे मुंबई दादर मे…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!