खो-खोच्या मैदानात राहाता तालुक्याचा क्रीडा जल्लोष! ७० संघांची दमदार उपस्थिती; बाभळेश्वरात दोन दिवस रंगणार चुरशीचे सामने
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


बाभळेश्वर , प्रतिनिधी : राहाता तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धांना बाभळेश्वर येथे उत्साहात प्रारंभ झाला. १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या या स्पर्धांमध्ये सुमारे ७० संघ सहभागी झाले असून, दोन दिवस क्रीडांगणावर खो-खोचा थरार रंगणार आहे.
कै. श्री.
नाथाजी पाटील म्हस्के शैक्षणिक संस्थेचे विद्या विकास पब्लिक स्कूल, बाभळेश्वर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि श्री. यशवंतराव चव्हाण विद्यालय, राजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, ३ व रविवार, ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यांमुळे बाभळेश्वर परिसर क्रीडामय झाला आहे. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब नाथाजी पाटील म्हस्के यांच्या हस्ते झाले.
यावेळी विद्या विकास पब्लिक स्कूलचे प्राचार्य राजेंद्र नालकर, नाथाजी पाटील म्हस्के ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ज्ञानेश्वर कांदळकर, कांबळे सर, सय्यद सर, राजेंद्र गायकर, अश्विनी पारखे मॅडम यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडारसिक उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व राहाता तालुका क्रीडा समितीच्या मार्गदर्शनाखाली सुनील गागरे (अध्यक्ष), अनिल चिंधे (कार्याध्यक्ष), राष्ट्रीय पंच राजेंद्र कोहकडे व बबनराव सातकर यांनी स्पर्धेचे कामकाज पाहिले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्या विकास पब्लिक स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

रिपोर्टर समसुद्दीन अली शेख, हमीरपुर दिनांक: 03 अक्टूबर, 2026 *सबजूनियर बालक कबड्डी के जिला स्तरीय चयन ट्रायल्स में…
पूरी खबर पढ़ें →
धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे धारावीकरांमध्ये विश्वासनिर्मिती होईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धारावीच्या वर्तमानासह नव्या भविष्याचेही ‘आधुनिक दर्शन' होणार! विलास केजरकर…
पूरी खबर पढ़ें →
‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या माध्यमातून गुंतवणुकीला नवी ओळख आणि विकासाला नवी दिशा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलास केजरकर भंडारा. भंडारा :…
पूरी खबर पढ़ें →
मौजा मुंडीपार तालुका साकोली येथील प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांसमक्ष पिक पाहणी व पंचनामा करताना दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पीक नुकसानीचे…
पूरी खबर पढ़ें →
महात्मा फुले सब्जी मंडीत स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात साजरा विलास केजरकर भंडारा. भंडारा:- महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी…
पूरी खबर पढ़ें →
शिक्षण व आरोग्य संस्थांच्या सुधारणांसाठी जिल्हानिहाय कालबद्ध अभियान राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अल्पकालीन व दीर्घकालीन कृती आराखडे तयार…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।