बोली भाषेतील शब्दांनी प्रमाण मराठी अधिक समृद्ध झाली – प्रमोद अणेराव अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात कार्यक्रम

बोली भाषेतील शब्दांनी प्रमाण मराठी अधिक समृद्ध झाली – प्रमोद अणेराव
अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात कार्यक्रम
विलास केजरकर भंडारा.
भंडारा, दि. ५ :- बोली हा प्रमाण भाषेतील महत्त्वाचा भाग आहे. बोली भाषेतून आलेल्या शब्दांनी प्रमाण भाषा अधिक समृद्ध झालेली आहे. कोणतीही भाषा टिकवायची असेल तर ती इतर भाषांमधून आलेल्या शब्दांनी समृद्ध होत राहणे आवश्यक आहे. अशी भाषा काळाच्या कसोटीवर टिकून राहते असे प्रतिपादन मराठी कवी तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद अणेराव यांनी आज केले.
ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित अभिजात मराठी भाषा सन्मान दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
दि. ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाखनी येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश खोब्रागडे तर उद्घाटक म्हणून जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ (दांदळे ) उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना श्री. अणेराव म्हणाले की, माणसाने अन्न संस्कृती आणि शब्द संस्कृती निर्माण केली असून त्या जपल्या आहेत. भाषा, संस्कृती आणि परंपरा या एकमेकींच्या हातात हात घालून पुढे जात असतात. जी भाषा व्यवहारातून हद्दपार होते, ती काळाच्या कसोटीवर टिकून राहू शकत नाही. सध्या मराठी भाषेव्यतिरिक्त इंग्रजी भाषेचे प्राबल्य वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुढील पिढीने अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन वाचन करावे तसेच आपल्या बोली भाषेचे जतन व संवर्धन करून ती समृद्ध करावी असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी भंडारा-गोंदिया परिसरातील झाडीबोली ही समृद्ध बोलीभाषा असल्याचे सांगितले. बोलीभाषा जगवायची असेल तर तिचा दैनंदिन व्यवहारात वापर झाला पाहिजे. ती नियमितपणे बोलली गेली पाहिजे. संस्कृतीच्या बदलत्या प्रवाहामुळे मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये, यासाठी भाषेचे जतन आवश्यक आहे. एखादी भाषा किंवा बोली बोलणारा समुदाय जिवंत राहिला आणि त्याचे अस्तित्व टिकले, तरच ती भाषा पुढील पिढीकडे प्रवाहित होत राहते, असे त्यांनी सांगितले.
आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यातून होणाऱ्या रेडिमेड सर्जनशील प्रक्रियेमुळे मानवी सर्जनशीलता कमी होऊ नये, यासाठी शब्दांच्या पाठीमागील भाव जिवंत ठेवणे आवश्यक आहे. मातृभाषेचा विकास करण्यासाठी अधिकाधिक वाचन, चिंतन आणि मनन केले पाहिजे. मराठी भाषेचा सन्मान आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. खोब्रागडे यांनी केले.
जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांनी मराठी भाषा संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय विभागांकडून करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. मराठी भाषेचा शासकीय कामकाजात प्रभावी वापर तसेच भाषा संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी खोम्नेद्र बोपचे यांनी केले. आभार प्रदर्शन लिपिक राजेश शरणागते यांनी केले.
**All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।







