Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

चंद्रपूरच्या कॅन्सर रुग्णालयावर सायबर हल्ला; हॅकर्सकडून 1.23 बिटकॉइनची खंडणी मागणी! चंद्रपूर, महाराष्ट्र :

14 Nov 2026, 06:10 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
चंद्रपूरच्या कॅन्सर रुग्णालयावर सायबर हल्ला; हॅकर्सकडून 1.23 बिटकॉइनची खंडणी मागणी! चंद्रपूर, महाराष्ट्र : - चंद्रपूर, महाराष्ट्र

चंद्रपूरच्या कॅन्सर रुग्णालयावर सायबर हल्ला; हॅकर्सकडून 1.23 बिटकॉइनची खंडणी मागणी! चंद्रपूर, महाराष्ट्र :
चंद्रपूर येथील कॅन्सर केअर फाउंडेशन हॉस्पिटलवर रॅन्समवेअर (Ransomware) सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या कथित सायबर हल्ल्यात रुग्णालयाच्या सर्व्हरमधील महत्त्वपूर्ण डेटा लॉक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, तो पुन्हा मिळवण्यासाठी हॅकर्सनी 1.23 बिटकॉइनची खंडणी मागितल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्यात रुग्णालयाच्या आयटी विभागाला सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण जाणवली.

तपासणीदरम्यान सर्व्हरवरील डेटा एन्क्रिप्ट झाल्याचे आणि खंडणीची मागणी करणारा संदेश दिसल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी 1.23 बिटकॉइनची किंमत अंदाजे 75 ते 80 लाख रुपये असल्याचा दावा करण्यात आला होता.

या हल्ल्यामुळे रुग्णालयाची हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम (HIMS) प्रभावित झाल्याची माहिती आहे. रुग्णांचे वैद्यकीय रेकॉर्ड, तपासणी अहवाल, केमोथेरपीचे वेळापत्रक, ऑपरेशनची माहिती, बिलिंग आणि प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी वेळेवर उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत रुग्णालयाच्या डिजिटल यंत्रणेवर सायबर हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने रामनगर पोलीस आणि सायबर यंत्रणेशी संपर्क साधल्याची माहिती आहे. या हल्ल्याचा स्रोत काय होता, रुग्णांचा वैयक्तिक डेटा चोरीला गेला आहे का आणि यामागे आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

रुग्णांच्या माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! या घटनेमुळे रुग्णालयांमधील डिजिटल माहितीच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

प्रत्येक रुग्णालयाने मजबूत सायबर सुरक्षा व्यवस्था, सुरक्षित डेटा बॅकअप, फायरवॉल आणि कर्मचाऱ्यांसाठी सायबर सुरक्षा प्रशिक्षण अनिवार्य करणे गरजेचे आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

बिहार के अररिया जिले के कुआरी थाना क्षेत्र में शनिवार सुबह एक अप्रिय घटना सामने आई। पहुंशी हाईस्कूल के समीप पिकअप वाहन और सुजुकी कार के बीच टक्कर के बाद विवाद होने की बात सामने आई
चोर जामिनावर मोकाट, मालक मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत; चोरीची क्रूझर गेली कुठे? धनांजा पुलिस स्टेशन के
Washim14 Nov

चोर जामिनावर मोकाट, मालक मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत; चोरीची क्रूझर गेली कुठे? धनांजा पुलिस स्टेशन के

चोर जामिनावर मोकाट, मालक मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत; चोरीची क्रूझर गेली कुठे? धनांजा पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले…

पूरी खबर पढ़ें →
भारत-नेपाल सीमा पर एसएसबी की बड़ी कार्रवाई, खाद और 2374 युगल मजे के साथ एक युवा गिरफ्तार
Siddharthnagar14 Nov

भारत-नेपाल सीमा पर एसएसबी की बड़ी कार्रवाई, खाद और 2374 युगल मजे के साथ एक युवा गिरफ्तार

सिद्धार्थनगर भारत-नेपाल सीमा पर 43वीं वाहिनी सशस्त्र बल (एसएसबी) की टीम ने जवानों के खिलाफ कार्रवाई करते हुए…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!