चांदा प्रतिनिधी विजय धाडगे ….नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चांदा येथे भारतीय संविधान दिन उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानिमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेत विद्यार्थी प्रणव विठ्ठल धुमाळ यांनी संविधानाचे महत्त्व लोकशाही मूल्य नागरिकाची हक्क अधिकार आणि कर्तव्य याविषयी प्रवेश विचार मांडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य रघुनाथ भोसले सर हे होती तर प्राध्यापक भाऊसाहेब तांबे यांनी प्रास्ताविक केले प्राध्यापक भाऊसाहेब पानसरे भगवान भांबड यांनी संविधान दिनाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विशेष म्हणजे प्राध्यापक रावसाहेब राशीनकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी भारतीय संविधानाच्या प्रति उपलब्ध करून देण्यात आल्या यावेळी प्राचार्य अश्युमन वाकचौरे परवेशक राजेश शेंडगे प्राध्यापक रावसाहेब राशीनकर एकनाथ आव्हाड संजय ढेरी राजेंद्र पाठक प्राध्यापक दिलीप शशी स्वाती दळवी शरीर उमरडे युवरा गायकवाड श्रद्धा वासनी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी 26 11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना जवाहर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चांदा यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली