A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

ज्ञानाच्या अथांग महासागराला कोटी कोटी वंदन.हा लेख लिहिण्यासाठी मला तीन दिवस लागले सर्वांनी मन लावून वाचावे,व बाबासाहेबांचा संपूर्ण इतिहास समजून घ्यावे सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भिम

ज्ञानाच्या अथांग महासागराला कोटी कोटी वंदन.हा लेख लिहिण्यासाठी मला तीन दिवस लागले सर्वांनी मन लावून वाचावे,व बाबासाहेबांचा संपूर्ण इतिहास समजून घ्यावे सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भिम

प्रेस नोट
अहिल्यानगर/नागपूर

ज्ञानाच्या अथांग महासागराला कोटी कोटी वंदन.हा लेख लिहिण्यासाठी मला तीन दिवस लागले सर्वांनी मन लावून वाचावे,व बाबासाहेबांचा संपूर्ण इतिहास समजून घ्यावे सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भिम

🙏*६ डिसेंबर १९५६ ला वार गुरुवार या देशाचे विधाते,या भारत देशाला गौरवशाली सविधान अर्पण करणारे,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दीनदुबळ्या यांचे सर्व मानवजातीचे उद्धारक आपल्यातून निघून गेले,त्यांने डोळे मिटले तेव्हा करोडोंच्या डोळ्यांतून पाणी घळघळा वाहू लागले.त्यांने श्वास मिटला तेव्हा अनेकांचे उच्छवास सुरू झाले ५ डिसेंबर रोजी नानक चंद रत्तू ५-३० ला आला त्यावेळी बाबासाहेबांचा चेहरा म्लान झालेला व ते अस्वस्थ असलेले त्याला दिसले. बाबासाहेब तेथेच थोडा वेळ डोळे मिटून बसून राहिले आणि हळू आवाजात, बुद्धम् शरणम् गच्छामि त्रिशरण म्हणू लागले.नंतर त्यांनी नानाचंदला,बुद्ध भीम गीत हे रेकॅड लावायला सांगितली व त्या गीतांबरोबर आपणही गुणगुण लागले.नोकराने जेवणास यायला सांगितले तेव्हा.जेवणाची इच्छा नाही म्हणाले,नानकचंदच्या आग्राहान नंतरच जेवणास उठले.इच्छा नसतानाही दोन घास खाल्ले व परत हॉलमध्ये येऊन बसले,नानकचंदला डोकीला तेल लावून मसाज करायला सांगितले. मसाज संपल्यावर ते परत हॉलमधून गेले.टेबलावर बसले नानकचंदजवळ दिलेले पुस्तक बाजूच्या टेबलावर होते.त्या टेबलावर या पुस्तकांशिवाय काही ग्रंथाची टाईप मजकूर यांचा ढीग पडलेला होता.बाबासाहेबांनी बुद्धा,ॲण्ड हीस धम्मा,नानकचंद रत्तू ला टाईप करायला सांगितले सर्व ग्रंथ रात्रीचे ११-१५ टाईप करून झाले होते,नानकचंद रात्रौ घरी निघाले,इतक्यात.सुदामने त्यांना परत बोलावले व सांगितले, साहेब तुम्हाला बोलावताहेत ते परत येऊन साहेबांना म्हणाले,साहेब कशाला बोलावलेत,साहेब म्हणाले,,बुद्धा ॲण्ड हिज धम्मा,,हे सर्व इथे माजजवळ ठेव.त्यावरुन मला दृष्टी फिरवायची आहे. नानकचंदने त्याप्रमाणे केले व ते घरी जाताना थोड्या अंतरावरच त्यांची सायकल पंक्चर झाली.आणि सर्व दुकानही बंद झालेली,त्यांना तसेच रखडत पायी जावे लागले.मध्यरात्र उलटली होते.झोपायला त्यांना एक वाजून गेला होता.दि.६ ला नानकचंद रतू सकाळी नेहमीपेक्षा उशीराच उठला.त्यांच्या लक्षात आलं की.साहेबांनी सकाळी लवकर बोलावले आहे.ते तसेच आपली सकाळची कामे भरभर आटपावीत सामान बाहेर काढतात न काढतात तोच सुदामा त्यांच्या पुढे उभा राहिला आणि म्हणाला,,माईसाहेबांनी तुम्हाला लागलीच बोलावले आहे.माल गाडी घेऊनच पाठवले आहे,असाल तसे चला.नानक चंद तसेच बंगल्यावर गेला.माईसाहेबांनी त्यांना बाबासाहेबाच्या बिछान्याजवळ‌ नेले.साहेब मी आलो अहो,असे भांबावून मोठ्यांदा ओरडले.साहेबाच्या अंगाला त्यांनी हात लावला.त्यांना ते गरम असल्याचा भास झाला म्हणून ते छातीला मसाज करू लागले.माईसाहेबांनी नानकचंदला ऑक्सिजनचे सिलेंडर उघडयला सांगितले.व साहेबांना ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला.हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.तेव्हा कळून चुकले की,बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रचंड ग्रंथ आटोपलेला आहे. साहेबांच्या जवळच्या टेबलावर एक सिरींज व औषधे पडलेली होती.पुस्तके व टाईप केलेले कागदही अस्ताव्यस्त खाली पडलेले होते.नानकचंदने विचारले,हे कधी झालं? ही एवढी मोठी लायब्ररी ही त्यांचे इस्टेट याबद्दल ते माझ्याजवळ काहीच बोलले नाहीत.ते बाबा गेल्याचे पाहून मोठ्यांदा रडू लागले,बंगल्यातील,माळी,सुदामा वगैरे सर्व लोक गोळा झाले.माळ्याने बाबांच्या पायावर लोळण घेतली व,माझे भगवान गेले,म्हणून तो मोठ्यादा रडू लागला.माईसाहेबांनी ही बातमी सर्वांना कळवावयास व पुढची व्यवस्था कशी करायची हे पाहण्यास नानकचंद यास सांगितली.नानकचंदाने सुमारे ९ वाजता फोन करण्यास सुरुवात केली,सर्व लोक दहा-सव्वादहाच्या सुमारास आले. सर्वांचे बाबा गेले होते.!.दिल्लीतील रनिकटवर्तीयांना फोन केल्यानंतर मुंबईला सिद्धार्थ कॉलेजवर श्री तळवटकरांना व औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजवर.वराळे गुरुजी यांना फोन करून ही दुःखद बातमी कळविली.व त्याचबरोबर बाबांचा पार्थोव देह मुंबईस आणीत आहोत तरी तुम्ही कोणी दिल्लीस येऊ नये हेही सांगितले.सर्व मंडळी बाबांचा पार्थिव देह मुंबईला चार्टर्ड प्लेनने न्यायचा व्यवस्था करण्याचे ठरवीत होते.इतक्यात माईसाहेब तिथे आल्या व म्हणाल्या की,शव सारानाथला न्यावे ही चर्चा चालली असतात.मंत्री व लोकसभेचे व लोकपरिषदेचे सभासद बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आले दुःखावेगाने सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आले.आमचा स्वतंत्रदाता गेला.शव सारनाथ येथे नो नेता मुंबईला सर्व व्यवस्था ठीक होईल. बाबासाहेबांचे पार्थिव साडेचाला बंगल्याच्या बाहेर पडला तेव्हा बाबासाहेब जिंदाबाद,बाबासाहेबा अमर रहे!अशा घोषणा केल्या. लोकसमुदाय,,कश्मीरी दरवाजा,चांदणी चौक,नई सराई,चौरी बझार,हौजखास,अजमेरी दरवाजा,कॅनाॅट प्लेस,कझन रस्ता, इंडिया गेट,शहाजान रस्ता,पृथ्वीराज रस्ता,या भागांतून सफदरजंग विमानतळावर गेले तेव्हा रात्रौ नऊ वाजले होते.शव आणताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लाखो लोक रडत शेवटच्या दर्शनाहस उभे होते, बाबासाहेबांच्या नावाचा प्रचंड जयघोष केला.बरोबर रात्रौ ९-३९ व विमान दिल्लीहून निघाले.सकाळपून गोळा झालेली निकटवर्ती मंडळी. शास्त्रीयदृय,पूरणचंद,नानकचंद,टि.बी.भोसले वगैरे व माईसाहेब विमानात बसले.ते विमान मध्येच नागपूरला उतरविले गेले.तिथे असंख्य अनुयायांनी साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिल्यावर ते रात्रौ १-३० सांताक्रुझ विमानतळावर उतरवले प्रथम ६ डिसेंबरला दिल्लीत असे ठरविले होते की,तारीख ७ ला सकाळी १०-३० च्या सुमारास शवाला अग्नीसंस्कार करावा.तोपर्यंत बाबासाहेबांची मृत्यूची बातमी सर्व देशभर,संपूर्ण विश्वभर,रेडिओ, मार्फत दुपांरपर्यंत पसरली.लोक मिळेलं त्या वाहनाने व गाड्यातून जागा न मिळाल्यास टपावर बसूनसुद्धा बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनाला येऊ लागले.मुंबईच्या सांताक्रूज विमानतळावरही प्रचंड लोकसमुदाय हजर होते.तेथून बाबासाहेबांचा पार्थिव देह दादरच्या त्यांच्या लाडक्या राजगृहात आणला.त्यांचा लाडका मुलगा यशवंत आंबेडकर व मुकुंद आंबेडकर,तबकात मेणबत्या घेऊन आले.दर्शनार्थो लोकांची रांग एवढी लांब होती की,सबंध हिंदू कॉलनीला वेढा पडला होता हिंदू कॉलनीतील लोकांनी,आमच्या वस्तीतील ज्ञानीयांच.राजा गेला.आमच्या हिंदू कॉलनीचे भूषण हरवले,असा उद्गगार.काढले दर्शनासाठी तीन-चार तास उभे राहवे लागले.मुंगीच्या पावलांनी लोक पुढे सरकत होते.समता सैनिक दलाचे स्वयंसेवक व अधिकारी यांना जमलेल्या लाखो लोकांची व्यवस्था करण्यासाठी जिवाचे रान केले.महायात्रेला आरंभ झाला.त्या प्रेतयात्रेत पुढे व मागे लाख लोक अश्रू गाळीत आणि,बुद्ध धम्म शरणम् गच्छामि, त्रिशरण हुंदके देत म्हणत चालले होते,यात्रा दादर,हिंदू कॉलनी,परळ, एल्फिन्स्टन ब्रिज,सायनी रोड,गोखले रोड,या मार्गाने,दादरच्या चौपाटीवर आली,शिवाजी पार्कच्या,भागेश्वर समशानभूमित,संध्याकाळी ६-३० वाजण्याच्या सुमारास पोचली, बाबासाहेबांचे शव सर्वांना दिसेल उंच व्यासपीठावर ठेवण्यात आले.दोन लक्ष लोकांनी त्यांचे अत्यदर्शन घेतले,त्यांचे पुत्र यशवंतराव मध्ये हातात बुद्धाची प्रतिमा घेऊन,माईसाहेब,व पुतणे मुकुंदराव हातात जळत्या मेणबत्तांच्या थाळ्या घेऊन उभे राहिले,भगवान बुद्धांची मूर्ती घेऊन,भिक्षूंनी धार्मिक विधीस प्रांरभ केला.ते करुण दृश्य पहाताना लक्षावधी लोकांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते,यानंतर महास्थवीर भिक्षु आनंद कौसल्यायन.यांनी नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स,ही प्रार्थना,बुद्धं सरणं गच्छामि,धम्मं शरणं गच्छामि व संघं सरणं गच्छामि,हे मंत्र व पंचशील विधी सांगितला.१६ तारखेस लाखो लोकांना धम्मदीक्षा देण्यासाठी इथे येणार होते,देहासमोर लाखो अस्पृश्य धर्मांतर करण्याचा निश्चय करीत आहेत,लाखो हात वर झाले.भिक्षु आनंद कौशल्यान यांनी आजच बाबांच्या नश्वर देहाला साक्षी ठेवून,यांच्या अग्निसंस्कार प्रसंगी लाखो लोकांना धम्मा दीक्षा दिली,यानंतर चंदनाच्या चितेवर चढविलेल्या बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शवाला सशस्त्र पोलीस दलाने त्रिसर बंदुकीने बार काढून मानवंदना दिली,गंभीर स्वरात त्यांच्या देहाला,यशवंतराव आंबेडकरांनी आपल्या प्रिया पित्याच्या पार्थिवाला अग्नि दिली.लाकडांनी पेट घेताच लाखोंच्या अंत;करण्यानेही पेट घेतला.अग्नि भैय्यासाहेबांयांच्या हस्ते संध्याकाळी ७-१५ वाचता अग्नी देण्यात आल रविवार दि ९ डिसेंबर ला बाबासाहेबांची शक्षा एका मोठ्या कलशात घांलून तो कलश यशवंतरावांनी आपल्या डोक्यावर घेतले तेव्हा तो कलश त्यांना प्रचंड वजनदार भासला.सर्व जगाचे ओझे आपल्याच डोक्यावर आहे असे त्यांना जाणवले,आंबेडकरी चळवळीची जबाबदारी भैय्यासाहेबांच्या शिरावर येऊन ठेपली होती,भैय्यासाहेबांनी कलश ट्रकपर्यंत नेले,चौपाटीपासून राजगृहपर्यंत मिरवणुकीत लाखो लोक त्रिशरणाचा घोष करीतत,राजगृहातील खोलीत,जेथे त्यागमाता आईरमाई यांचे देहावसान झाले होते त्याठिकाणी, बाबासाहेबांचे कलश लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला. बाबासाहेबांच्या,प्रतिज्ञा,पूर्ण करण्याची जबाबदारी यशवंतराव आंबेडकर यांच्यावर आली,त्यानंतर भैय्यासाहेबांनी १९५७ पासून बुद्ध धम्माची जबाबदारी स्वतावर घेतली,सर्व बुद्धांना व दलितांना सर्व हक्क व अधिकार मिळवून दिले,१४ एप्रिल १९६६ रोज चैत्यभूमीचे या स्मारक भैयासाहेब यांच्या अथक परिश्रमातून उभे राहिले,भैय्यासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र व देश बुद्धधम्माच्या चळवळीसाठी पुजून काढला भैय्यासाहेबांनी आंबेडकर चळवळीचा वारसा समोर नीला,१९५६ नंतरच बाबासाहेबांचा अधुरी कार्य सूर्यपुत्र भैय्यासाहेबांनी केले त्याचे काळीज हल्ला झाले तेव्हा लाखोंच्या काळजावर त्याचेच नाव कोरले गेले स्वाभिमानी जय भीम,फक्त जय भिम हेच नाव कोरले गेले,आज दि.६ डिसेंबर १९५६ रोजी विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानाच्या अथांग सागरास कोटी कोटी वंदन.!!
🌹🌹💐💐👏💐💐🌹🌹

*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*
आकाश दादा शिरसाट
*जय भीम*

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!