A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*भगवान बिरसा मुंडा जयंती गडचिरोलीत श्रद्धाभावाने साजरी…* *मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्याकडून प्रतिमेचे पूजन व अभिवादन*

*भगवान बिरसा मुंडा जयंती गडचिरोलीत श्रद्धाभावाने साजरी…* *मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्याकडून प्रतिमेचे पूजन व अभिवादन*

प्रेस नोट
गडचिरोली

*भगवान बिरसा मुंडा जयंती गडचिरोलीत श्रद्धाभावाने साजरी…*
*मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्याकडून प्रतिमेचे पूजन व अभिवादन*

गडचिरोली, दि. १५ नोव्हेंबर २०२५

आदिवासी स्वाभिमान, जल–जमीन–जंगल हक्कांचे प्रेरणास्थान आणि संघर्षाचे प्रतीक असलेले जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली येथे अत्यंत श्रद्धा, आदर आणि सन्मानाने साजरी करण्यात आली.

या जयंती कार्यक्रमात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ज्या तत्त्वांसाठी व मूल्यांसाठी बिरसा मुंडा यांनी संघर्ष केला, त्या आदिवासी समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी आपण नेहमीच कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,कि.मो. प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हा प्रमुख डॉ. नितिन कोडवते,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,ज्येष्ठ नेते सुधाकरजी येंगदलवार,गजानन येंगदलवार, माजी भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,संजय बारापात्रे, मंगेश रणदिवे, अभिजित कोरडे, आशिष कोडापे,निखिल चरडे, आशिष रोहनकर,सोमेश्वर धकाते,यांसह भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचे स्मरण करत, त्यांच्या आदर्श व विचारांना अनुसरून समाजहित, विकास आणि आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी कार्यरत राहण्याची प्रतिज्ञा या कार्यक्रमात घेण्यात आली.

भगवान बिरसा मुंडा अमर राहो!
जय बिरसा! जय आदिवासी समाज!

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!