

लातूर:- येरोळ येथील जि.प.प्रशाला येरोळ
शिक्षक हा कोणत्याही अपेक्षेने नव्हे तर आत्मप्रेरित होऊन या पेशात उतरलेला असावा.त्याच्या जगण्याचा केंद्रबिंदू हा नेहमी विद्यार्थी असायला हवा. आपण एक समाजाची पिढी घडवत असल्याची जाणीव नेहमी शिक्षकाला भासत राहायला हवी. विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या विषयाबद्दल गोडी निर्माण करत असतानाच. त्या विद्यार्थ्यांच्या उपजत गुणांना ओळखून त्याच्यातल्या अभिव्यक्तिला योग्य ते व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न शिक्षकाने करायला हवा. इतकंच नव्हे तर त्यांच्या विषयाचं उत्तम ज्ञान असतानाच शिक्षकाला बाकीच्या अनेक विषयांचे आणि त्यांच्या अभ्यासक्रमाचा ओझरता स्पर्श आणि त्याबद्दल आदर असायला हवा. तो उत्तम वाचक आणि मुलांचा सखा असायला हवा. वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करून संवाद घडवणारा असावा. हाताची पाची बोटं एक सारखी नसतात. याच प्रमाणे प्रत्येक विद्यार्थी सारखा नसतो. त्याच्यातली उत्तुंग प्रतिभा ओळखून त्याला त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अनेकांचा सल्ला घेऊन, यथायोग्य मार्गदर्शन शिक्षकाने करायला हवं. शिक्षक हा नेहमी ज्ञान घेण्यासाठी व्याकुळ असायला हवा. वेळे प्रसंगी शिक्षकाला विद्यार्थ्यांकडून शिकावं लागलं तरी त्याने त्याची लाज बाळगता कामा नये. त्यासाठी शिक्षकाने आजन्म आपल्या प्रतिभेला विद्यार्थीपण चिकटवून ठेवायला हवं. शिक्षकाने दोन विद्यार्थ्यांत भेद करता कामा नये.
अगदीच वाटलं तर विद्यार्थ्यांशी वैयक्तिक बोलून त्याच्या प्रगतीच्या टप्प्यातील अडचण समजून घेणं एका शिक्षकाकडून अपेक्षित आहे. या सगळ्या गुणांनी परिपूर्ण असे शिक्षक धम्मपाल नारायण निचळे 31/08/2006 पासून शाळा नावाच्या इमारतीला विद्येच मंदिर बनविण्यासाठी केलेली धडपड आणि प्रयत्न.यामुळे निचळे सर यांना पंचायत समिती(शिक्षण विभाग) शिरूर अनंतपाळ आयोजित तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि याच वेळी जिल्हा आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला.हा पुरस्कार आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते देण्यात आला.व तसेच तालुक्यातील इतर आदर्श शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला यावेळी मा.खाजदर शिवाजीराव काळगे, डॉ.श्रीमती भागीरथी गिरी, शिक्षण अधिकारी श्री नागेश मापरी, शिक्षणं अधिकारी श्रीमती वंदना फुटाणे, गटविकास अधिकारी श्री बळीराम चव्हाण, गट शिक्षण अधिकारी श्री अनिल पांगे, भाजप तालुका अध्यक्ष मंगेश पाटील,तालुक्यातील सर्व शिक्षक उपस्थित होते















