

चंद्रपूर:- तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र द्वारे आयोजित ७ ते ११ डिसेंबर २०२५ या कालावधीत नाशिक येथे संपन्न झालेले महाराष्ट्र ओपन स्टेट चॅम्पियनशिप मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे एकूण 17 प्रतिस्पर्धी यांनी सहभाग घेतला त्यामध्ये सीनियर पूमसे फ्रीस्टाईल मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या संघानी सुस्वर्ण पदक आपल्या नावावर केले व त्याच बरोबर जानेवारी महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय फेडरेशन कप साठी आपली जागा निश्चित केली चंद्रपूर जिल्हाच्या सिनिअर फ्रीस्टाईल पुमसे संघात कु कशिश बापूराव कुमरे, कु. तनूजा देवेन्द्र पायघन, कु. आचल तूकडोजी आत्राम, कू. समीक्षा बंडुजी सावसाकडे, रूतिक भोलाराव मेश्राम, कृष्णा बंडूजी डायवलकर यांचा समावेश होता. त्याच बरोबर व्यक्तित्व रिकोनाइज पूमसे कु. कशिश बापुराव कुमरे हिने रायगड जिल्हाला मात देऊन सुवर्ण पदक वर आपला नाव नोंदवले व राष्ट्रीय फेडरेशन कप साठी आपली जागा पक्की केली. त्याच बरोबर क्योरिगी फाईट मध्ये कॅडेट ग्रुप मध्ये ३३. किग्रा वजनगटात कु. कावेरी प्रफुल किन्नाके हिने अंतिम फेरीत लढतदेत रौप्य पदक पटकावली त्याच प्रमाणे सिनिअर ग्रुप मध्ये ५३ किग्रा मध्ये कु. समिक्षा बंडूजी सावसाकडे हिने पुणे सोबत अंतिम फेरीत रौप्य पदकाची मानकरी ठरली व आता दोन्ही खेळाडूची निवड राष्ट्रीय फेडरेशन कप साठी करण्यात आली आहे. सर्व तायक्वांडो प्रेमी व विद्यार्थ्यांनी मध्ये सुवर्ण पदक व रौप्य पदक पटकाविले. त्या मुळे विद्यार्थांना मधे एक नवीन आनंदाचे झलक निर्माण झाली. आणि आपली मेहनत व जिद्द यांची मदत घेऊन खेळाडूंनी काय करता येते हे करून दाखवले. तसेच उत्कृष्ट प्रदर्शन करुन, कु. कनक राजू सौधागडे, कु. मानसी गजेंद्रसिंह दरबार, कु. माही ज्ञानेश्वर मडावी, अमन आशिष सुखदेव, यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून आपलं एक नवीन वर्चस्व स्थापित केलय. सर्व खेळाडूंना आपल्या यशाचा श्रेय आपल्या आई वडील व मुख्य प्रशिक्षक, अंतरराष्ट्रीय खेळाडू, माजी सैनिक, NIS कोच डिस्ट्रीक्ट तायक्वांडो असोशिएशन ऑफ चंद्रपूरचे सचिव श्री. बजरंग वानखडे सर व राष्ट्रीय खेळाडू NIS कोच श्री. मुकेश पाण्डेय सरांना दिला तसेच डिस्ट्रिक्ट तायक्वांडो असोशिएशन ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष श्री. अमन तेमुर्डे सर, प्राध्य. तानाजी बायस्कर सर, श्री.सागर कोल्हे, श्री सचिन बोधाने, श्री. आकाश भोयर, श्री. अक्षय हनुमंते व इतर पदाधिकारी यांनी होणाऱ्या राष्ट्रीय फेडरेशन कपसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.











