Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
A2Z सभी खबर सभी जिले की

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांचा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा

29 Jul 2026, 04:12 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
Meghna Sakore 2 1536x912 1

समीर वानखेड़े ब्यूरो चीफ: 

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत कृषी पंपांना वीजजोडणी, बल्लारपूर येथे ईएसआयसी रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, विदर्भ व मराठवाडा वीज प्रोत्साहन योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ८०० मेगावॅट संच कार्यान्वित करण्यासंदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

बैठकीस आमदार सुधीर मुनगंटीवार, महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढीकर, राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे संचालक डॉ. अशोक थोरात;तसेच महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत या दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या.

 

बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील १,७४० प्रलंबित कृषी पंपांना तातडीने वीजजोडणी उपलब्ध करून देण्याबाबत विशेष चर्चा करण्यात आली. यासंदर्भात सौर ऊर्जेच्या अनुषंगाने येत्या दहा दिवसांत आवश्यक तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. बल्लारपूर येथे ईएसआयसी रुग्णालय, राज्य राखीव पोलीस दलाची वसाहत तसेच महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी विसापूर येथील ३१.३५ हेक्टर क्षेत्रफळाच्या बंद पॉवर हाऊसची जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

 

स्वतंत्र विदर्भ क्षेत्र वीज प्रोत्साहन योजनेसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या ₹५५० कोटींच्या तरतुदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. संबंधित समिती सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ८०० मेगावॅट क्षमतेचा संच कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आला असून, तो लवकरच मार्गी लागेल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

 

महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीतील रस्ते, नाले, निवासस्थाने, गाळे तसेच स्विमिंग पूल आणि व्यायामशाळेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. वसाहतीतील एकूण ५३० इमारतींपैकी १४३ इमारतींचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे.

 

यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्नांचा प्राधान्याने पाठपुरावा करून ते वेळेत मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून विविध विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

**बड़ी ब्रेकिंग न्यूज़ | NCLT का ऐतिहासिक फैसला: लखनऊ डायोसेसन ट्रस्ट एसोसिएशन (LDTA) पर चला कानूनी चाबुक, पूर्व जस्टिस लोकपाल सिंह बने स्वतंत्र प्रशासक**
A2Z सभी खबर सभी जिले की22 Sep

**बड़ी ब्रेकिंग न्यूज़ | NCLT का ऐतिहासिक फैसला: लखनऊ डायोसेसन ट्रस्ट एसोसिएशन (LDTA) पर चला कानूनी चाबुक, पूर्व जस्टिस लोकपाल सिंह बने स्वतंत्र प्रशासक**

# 🚨 **बड़ी ब्रेकिंग न्यूज़ | NCLT का ऐतिहासिक फैसला: लखनऊ डायोसेसन ट्रस्ट एसोसिएशन (LDTA) पर चला कानूनी…

पूरी खबर पढ़ें →
बड़ी खबर | फतेहपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, चेकिंग के दौरान अवैध चाकू के साथ युवक गिरफ्तार
A2Z सभी खबर सभी जिले की22 Sep

बड़ी खबर | फतेहपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, चेकिंग के दौरान अवैध चाकू के साथ युवक गिरफ्तार

मुजफ्फराबाद में SBI बैंक के सामने ट्यूबवेल के पास पुलिस ने दबोचा — आर्म्स एक्ट में मुकदमा दर्ज,…

पूरी खबर पढ़ें →
बड़ी खबर | 38 साल पुराने मामले में गागलहेड़ी पुलिस की बड़ी कार्रवाई
A2Z सभी खबर सभी जिले की22 Sep

बड़ी खबर | 38 साल पुराने मामले में गागलहेड़ी पुलिस की बड़ी कार्रवाई

1988 की दाण्डिक अपील और 1986 के सेशन विचारण से जुड़ा NBW वारंटी गिरफ्तार, ग्राम हरौड़ा से अतरू…

पूरी खबर पढ़ें →
*कराटे स्पर्धा में चमके सेंट पॉल स्कूल के छात्र, राष्ट्रीय स्पर्धा के लिए चयन
Chandrapur22 Sep

*कराटे स्पर्धा में चमके सेंट पॉल स्कूल के छात्र, राष्ट्रीय स्पर्धा के लिए चयन

*बल्लारपूर, 20 सितंबर 2026* शोतोकान कराटे-डू एसोसिएशन द्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य स्तरीय कराटे स्पर्धा रविवार, 20 सितंबर 2026…

पूरी खबर पढ़ें →
टीकमगढ़ पुलिस ने अंतर्राज्यीय मोटरसाइकिल चोर गिरोह का किया पर्दाफाश 07 आरोपी गिरफ्तार, 09 चोरी की मोटरसाइकिल सहित करीब 3.90 लाख रुपये नगदी बरामद
A2Z सभी खबर सभी जिले की22 Sep

टीकमगढ़ पुलिस ने अंतर्राज्यीय मोटरसाइकिल चोर गिरोह का किया पर्दाफाश 07 आरोपी गिरफ्तार, 09 चोरी की मोटरसाइकिल सहित करीब 3.90 लाख रुपये नगदी बरामद

पुलिस अधीक्षक टीकमगढ़ श्री सुधीर कुमार अग्रवाल के निर्देशन में जिले में चोरी एवं वाहन चोरी की घटनाओं…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
A2Z सभी खबर सभी जिले की21 Sep

राज्यपाल ने श्री बंशीधर मंदिर में की पूजा-अर्चना, झारखंड की सुख-शांति व समृद्धि की कामना

राज्यपाल ने श्री बंशीधर मंदिर में की पूजा-अर्चना, झारखंड की सुख-शांति व समृद्धि की कामना वैदिक मंत्रोच्चार के…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!