Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Ahmednagar

उसाचे उत्पादन वाढवा, पाण्याची जबाबदारी माझी : ना. राधाकृष्ण विखे पाटील

14 Sep 2026, 11:18 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
उसाचे उत्पादन वाढवा, पाण्याची जबाबदारी माझी : ना. राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर, महाराष्ट्र

सोनगाव ,प्रतिनिधी (शहाजी दिघे ) : सहकारी साखर कारखानदारीचे अर्थकारण भक्कम करण्यासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र आणि एकरी उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी एकरी उसाचे उत्पादन वाढवावे, पाण्याची जबाबदारी माझी, असा विश्वास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सिंचन प्रकल्पांना महायुती सरकारने मोठा निधी उपलब्ध करून दिला असून, नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याच्या सर्वेक्षणालाही मंजुरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७७ व्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

ना. विखे पाटील म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. कारखान्याचे अर्थकारण अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने इथेनॉल आणि बायो-सीएनजी प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत. बाहेरील उसावर अवलंबून न राहता कार्यक्षेत्रातच ऊस उत्पादन वाढविण्यासाठी संचालकांनी शेतकऱ्यांच्या थेट भेटी घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील पाणी प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. साकळाई, कुकडी आणि डिंभे-माणिकडोह प्रकल्पांना निधी उपलब्ध झाला असून, प्रवरा व गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी भविष्यात १२ लाख मेट्रिक टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगितले. यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिंचन प्रकल्पांना गती दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा विशेष ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

गौर थाना समाधान दिवस में उमड़ी फरियादियों की भीड़, SDM उमाकांत तिवारी ने त्वरित निस्तारण के दिए कड़े निर्देश
Basti14 Sep

गौर थाना समाधान दिवस में उमड़ी फरियादियों की भीड़, SDM उमाकांत तिवारी ने त्वरित निस्तारण के दिए कड़े निर्देश

थाना गौर परिसर में शनिवार को थाना समाधान दिवस का आयोजन किया गया, जहां अपनी समस्याएं लेकर पहुंचे…

पूरी खबर पढ़ें →
राष्ट्रीय मानव अधिकार आयोग के सदस्य प्रियांक कानूनगो का सागर आगमन
Sagar14 Sep

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग के सदस्य प्रियांक कानूनगो का सागर आगमन

सागर।वंदे भारत लाइव टीवी न्यूज रिपोर्टर सुशील द्विवेदी 8225072664 * राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC), नई दिल्ली के…

पूरी खबर पढ़ें →
थाना लवकुश नगर पुलिस की बड़ी कार्यवाही वर्क फ्रॉम होम के नाम पर 12 लाख से अधिक की ऑनलाइन फ्रॉड में 2 आरोपी गिरफ्तार
Chhatarpur14 Sep

थाना लवकुश नगर पुलिस की बड़ी कार्यवाही वर्क फ्रॉम होम के नाम पर 12 लाख से अधिक की ऑनलाइन फ्रॉड में 2 आरोपी गिरफ्तार

लवकुशनगर/छतरपुर थाना लवकुशनगर पुलिस की बड़ी कार्यवाही वर्क फ्रॉम होम के नाम पर 12 लाख रुपये से अधिक…

पूरी खबर पढ़ें →
अहिल्यानगरच्या औद्योगिक क्रांतीत प्रवरा बँकेने उतरावे : ना. राधाकृष्ण विखे पाटील
Ahmednagar14 Sep

अहिल्यानगरच्या औद्योगिक क्रांतीत प्रवरा बँकेने उतरावे : ना. राधाकृष्ण विखे पाटील

१ हजार कोटींच्या ठेवी; १,८०० कोटींचा व्यवसाय | सलग तिसऱ्या वर्षी शून्य टक्के एनपीए; सभासदांना १० टक्के लाभांश…

पूरी खबर पढ़ें →
साहित्याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल अधुरी : प्रो. सदानंद भोसले
Ahmednagar14 Sep

साहित्याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल अधुरी : प्रो. सदानंद भोसले

लोणी प्रतिनिधी (शहाजी दिघे ): कृत्रिम बुद्धिमत्ता आजच्या युगातील प्रभावी आणि स्मार्ट सहायक ठरत असली, तरी मानवी भावना,…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Satna14 Sep

*ब्रेकिंग न्यूज़: बिरसिंहपुर गैस एजेंसी पर उमड़ी उपभोक्ताओं की भारी भीड़*

बिरसिंहपुर (मध्य प्रदेश):तहसील मुख्यालय बिरसिंहपुर स्थित गैस एजेंसी पर आज सुबह से ही रसोई गैस के लिए उपभोक्ताओं…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!