Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

पत्रापुरता पाठपुरावा नाही तर प्रत्यक्ष कृती! आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मुल-नागपूर बससेवा पुन्हा सुरू

29 Sep 2026, 02:14 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
पत्रापुरता पाठपुरावा नाही तर प्रत्यक्ष कृती! आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मुल-नागपूर बससेवा पुन्हा सुरू - चंद्रपूर, महाराष्ट्र

समीर वानखेडे ब्युरो चीफ वंदे भारत लाइव्ह टीव्ही न्यूज:

मुल तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेली मुल-नागपूर एसटी बससेवा अखेर २९ सप्टेंबरपासून. पुन्हा सुरू झाली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही सेवा सुरू झाली आहे.

मुल-नागपूर बससेवा बंद झाल्याने विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि दररोज कामानिमित्त नागपूरला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. काही वर्षांपूर्वी या मार्गावर दिवसभरात सुमारे १५ फेऱ्या होत होत्या. ही सेवा म्हणजे केवळ प्रवासाचे साधन नसून शिक्षण, उपचार आणि रोजगाराचा आधार असल्याचे लक्षात घेऊन आ. मुनगंटीवार यांनी हा प्रश्न गंभीरपणे घेतला.

केवळ पत्र नाही, तर थेट पाठपुरावा

आ. मुनगंटीवार यांनी परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक आणि परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली. मात्र ते एवढ्यावरच थांबले नाहीत.

त्यांनी स्वतः परिवहन मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सेवा तातडीने सुरू करण्याची विनंती केली आणि आपल्या स्वीय सहाय्यकांना विभाग नियंत्रकांकडे पाठवून विभागीय पातळीवर प्रत्यक्ष पाठपुरावा केला. ‘पत्र दिले आणि विषय संपला’ अशी भूमिका न घेता निर्णय जमिनीवर उतरेपर्यंत पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यशैली पुन्हा एकदा दिसून आली.

मुल शहराचे भौगोलिक, शैक्षणिक आणि व्यापारी महत्त्व लक्षात घेता नागपूरशी थेट बससेवा असणे गरजेचे असल्याचे त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

लवकरच वाढीव बससेवाही सुरू होणार

आता उमरेड आणि नागपूर डेपोमधून नागपूर-मुल वाढीव बससेवा सुरू करण्यासाठीही आ. मुनगंटीवार यांनी पाठपुरावा सुरू केला असून ती सेवाही लवकरच सुरू होणार आहे.

बससेवा सुरू झाल्याने उपचार, शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि शासकीय कामांसाठी नागपूरला जाणाऱ्या मुलवासीयांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Azamgarh29 Sep

समेदा में दर्दनाक हादसा: तेज रफ्तार पिकअप ने 5 छात्राओं को रौंदा, इलाज के दौरान एक की मौत

आजमगढ़। सिधारी थाना क्षेत्र के समेदा स्थित लाइफ लाइन नर्सिंग कॉलेज के पास शनिवार रात तेज रफ्तार पिकअप…

पूरी खबर पढ़ें →
एक बहन का आधार बना तो दूसरी का अटका, बायोमेट्रिक और आंखें मैच होने पर सिस्टम ने मान लिया ‘डुप्लीकेट’
Sagar29 Sep

एक बहन का आधार बना तो दूसरी का अटका, बायोमेट्रिक और आंखें मैच होने पर सिस्टम ने मान लिया ‘डुप्लीकेट’

वंदे भारत लाइव टीवी न्यूज रिपोर्टर सुशील द्विवेदी 8225072664 *उत्तर प्रदेश के रामपुर से जुड़वा बहनों का एक…

पूरी खबर पढ़ें →
हर्रैया तहसील घमासान: लेखपालों के आंदोलन के आगे झुका जिला प्रशासन, एसडीएम उमाकांत त्रिपाठी हटाए गए!
Basti29 Sep

हर्रैया तहसील घमासान: लेखपालों के आंदोलन के आगे झुका जिला प्रशासन, एसडीएम उमाकांत त्रिपाठी हटाए गए!

प्रशासन झुका या समझौता हुआ? हर्रैया एसडीएम के तबादले ने खड़े किए गंभीर प्रशासनिक सवाल प्रशासनिक नीति पर…

पूरी खबर पढ़ें →
पत्रकार सुरक्षा कानून की मांग को लेकर श्रमजीवी पत्रकार संघ का सम्मेलन, 20 अक्टूबर से भोपाल में अनशन की चेतावनी
Niwari29 Sep

पत्रकार सुरक्षा कानून की मांग को लेकर श्रमजीवी पत्रकार संघ का सम्मेलन, 20 अक्टूबर से भोपाल में अनशन की चेतावनी

(मोहित दांगी जिला रिपोटर की निवाड़ी से रिपोर्ट)निवाड़ी। मध्य प्रदेश श्रमजीवी पत्रकार संघ का जिला स्तरीय सम्मेलन रविवार…

पूरी खबर पढ़ें →
વેરાવળ નગર પાલિકા સામે જનાક્રોશ સાથે રજૂઆત
Gir Somnath29 Sep

વેરાવળ નગર પાલિકા સામે જનાક્રોશ સાથે રજૂઆત

વેરાવળમાં રસ્તા બિસ્માર, પાણીના પ્રશ્ને નગરપાલિકા સમક્ષ મહિલાઓ દ્વારા આક્રોશ પૂર્વક રોડ, રસ્તા અને પાણી પ્રશ્ને રજૂઆત ચૂંટણી…

पूरी खबर पढ़ें →
अखंड हिंदू वाहिनी के हिंदू हुंकार महासम्मेलन में उमड़ा कार्यकर्ताओं का उत्साह, लखीमपुर से भी पदाधिकारियों ने की सहभागिता
Kheri29 Sep

अखंड हिंदू वाहिनी के हिंदू हुंकार महासम्मेलन में उमड़ा कार्यकर्ताओं का उत्साह, लखीमपुर से भी पदाधिकारियों ने की सहभागिता

पुवायां/शाहजहांपुर। शाहजहांपुर जनपद के पुवायां विधानसभा क्षेत्र स्थित गायत्री मैरिज लॉन में अखंड हिंदू वाहिनी द्वारा हिंदू हुंकार…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!