Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Gadchiroli

अल्लापल्ली येथे राष्ट्र सेविका समितीतर्फे नारीशक्तीचा जागर

01 Nov 2026, 12:54 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
अल्लापल्ली येथे राष्ट्र सेविका समितीतर्फे नारीशक्तीचा जागर - गडचिरोली, महाराष्ट्र

अल्लापल्ली येथे राष्ट्र सेविका समितीतर्फे नारीशक्तीचा जागर
‘नारी ही अबला नाही, तर दुर्गा आणि कालीचे शक्तिरूप!’ – माधे खन्ना राणी केशव मित्रा यांचे प्रतिपादन
अल्लापल्ली : राष्ट्र सेविका समितीतर्फे अल्लापल्ली येथे नारीशक्तीचा जागर घडविणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना खना राणी केशव मित्रा यांनी स्त्रीशक्ती, महिला सन्मान, स्वाभिमान आणि सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश दिला.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, नारी ही केवळ दुर्गा मातेचे, काली मातेचे शक्तिरूप नाही, तर ती प्रेम, माया, ममता, नम्रता आणि शांततेचेही प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्तीस्वरूप मानले जाते.

मात्र आजही समाजात महिलांचा अपमान, अन्याय आणि अत्याचाराच्या घटना घडत आहेत, ही चिंतेची बाब आहे. स्त्री ही अबला नसून सबला आहे.

तिच्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद, संकटांवर मात करण्याचे धैर्य आणि समाजाला योग्य दिशा देण्याची क्षमता आहे. महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपणे ही केवळ महिलांची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

समाजात शांतता, नम्रता, प्रेम, माया आणि ममता कायम राहिली पाहिजे; परंतु महिलांवर अत्याचार किंवा अन्याय होत असेल, तर महिलांनी एकत्र येऊन त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. अन्याय सहन न करता संघटितपणे संघर्ष करण्यासाठी प्रत्येक महिलेने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘नारीचा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान आणि नारीशक्तीचा जागर म्हणजे सशक्त समाजनिर्मितीची सुरुवात’, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमातून महिलांमध्ये आत्मविश्वास, एकजूट, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Rewari01 Nov

अखिल भारतीय ग्राहक पंचायत एवं आरडब्ल्यूए अंसल की संयुक्त पहल, योग और पर्यावरण संरक्षण का दिया संदेश

नवंबर। हरियाणा दिवस के अवसर पर अखिल भारतीय ग्राहक पंचायत एवं आरडब्ल्यूए अंसल के संयुक्त तत्वावधान में अंसल…

पूरी खबर पढ़ें →
🚨 पाली के ग्राम पहाड़जमनी में कथित धर्मांतरण का मामला! पास्टर सामे लाल पर आरोप, सरकारी जमीन पर कब्जे की भी उठी मांग
Korba01 Nov

🚨 पाली के ग्राम पहाड़जमनी में कथित धर्मांतरण का मामला! पास्टर सामे लाल पर आरोप, सरकारी जमीन पर कब्जे की भी उठी मांग

🚨 पाली के ग्राम पहाड़जमनी में कथित धर्मांतरण का मामला! पास्टर सामे लाल का नाम आया सामने, सरकारी…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!