Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

कुंभमेळ्याच्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोरपना तालुक्यातील आदिवासी नृत्याने भव्य स्वागत

04 Nov 2026, 12:17 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
कुंभमेळ्याच्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोरपना तालुक्यातील आदिवासी नृत्याने भव्य स्वागत - चंद्रपूर, महाराष्ट्र

कुंभमेळ्याच्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोरपना तालुक्यातील आदिवासी नृत्याने भव्य स्वागत
चंद्रपूर : भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक येथील तपोवन परिसरात कुंभमेळ्याच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त विशेष स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील आदिवासी मुला-मुलींनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.

आपल्या पारंपरिक वेशभूषेत आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या आदिवासी नृत्य पथकाचे नेतृत्व माननीय अशोकजी आलम, माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर जिल्हा आदिवासी आघाडीचे महामंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी चिचपल्ली येथील रहिवासी राकेश निंबसरकर यांनीही अशोकजी आलम यांच्यासोबत महत्त्वपूर्ण सहकार्य केले. देशाच्या महामहिम राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील आदिवासी मुला-मुलींना मिळालेली ही संधी संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या माध्यमातून आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेचे राष्ट्रीय स्तरावर दर्शन घडले. या उल्लेखनीय सहभागाबद्दल अशोकजी आलम, राकेश निंबसरकर तसेच आदिवासी नृत्य सादर करणाऱ्या सर्व मुला-मुलींचे परिसरातून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

ऑनलाइन निवेश के नाम पर 63 लाख 32 हजार 500 रुपये की धोखाधड़ी, राजुरा पुलिस ने दो आरोपियों को किया गिरफ्तार
Chandrapur04 Nov

ऑनलाइन निवेश के नाम पर 63 लाख 32 हजार 500 रुपये की धोखाधड़ी, राजुरा पुलिस ने दो आरोपियों को किया गिरफ्तार

ऑनलाइन निवेश के नाम पर 63 लाख 32 हजार 500 रुपये की धोखाधड़ी, राजुरा पुलिस ने दो आरोपियों…

पूरी खबर पढ़ें →
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन प्रकरणाचा यशस्वी तपास; महिला पोलीस निरीक्षक प्रभवती एकुरके यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचा दक्षता पदक
Chandrapur04 Nov

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन प्रकरणाचा यशस्वी तपास; महिला पोलीस निरीक्षक प्रभवती एकुरके यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचा दक्षता पदक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन प्रकरणाचा यशस्वी तपास; महिला पोलीस निरीक्षक प्रभवती एकुरके यांना केंद्रीय…

पूरी खबर पढ़ें →
बेगूं नगर पालिका चुनाव 2026 को लेकर भाजपा का कार्यकर्ता सम्मेलन आयोजित
Chittorgarh04 Nov

बेगूं नगर पालिका चुनाव 2026 को लेकर भाजपा का कार्यकर्ता सम्मेलन आयोजित

रिपोर्टर : दुर्गालाल पालीवाल बेगूं। भारतीय जनता पार्टी राजस्थान के पूर्व प्रदेश अध्यक्ष एवं चित्तौड़गढ़ लोकसभा क्षेत्र के…

पूरी खबर पढ़ें →
🔴 आयरनमैन 70.3 गोवा में बड़े राजा का दमदार प्रदर्शन, 113 किलोमीटर की कठिन चुनौती पूरी कर बने कुंडा का गौरव गोवा। साहस, संकल्प और दृढ़ इच्छाशक्ति की मिसाल पेश करते हुए माननीय बड़े
error: Content is protected !!