आई-वडिलांकडे दुर्लक्ष केलं तर खिशाला झळ! दरमहा 10,000 रुपयांपर्यंत निर्वाह भत्ता द्यावा लागणार, अन्यथा होणार कारवाई
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


दिनांक : २३ नोव्हेंबर २०२६ | Dr. Pintu Paul Distric Repoter Vande Bharat Live Tv
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केलं तर खिशाला झळ! दरमहा 10,000 रुपयांपर्यंत निर्वाह भत्ता द्यावा लागणार, अन्यथा होणार कारवाई
मुंबई : आई-वडिलांनी लहानपणी तुम्हाला सांभाळलं, आता त्यांना सांभाळायची वेळ आली तर तोंड फिरवलं? आता हे चालणार नाही.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांनुसार पालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलांवर आणि नातेवाईकांवर आता कायदेशीर वचक ठेवण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत.
काय आहे नियम?
न्यायाधिकरण प्रतिवादीला म्हणजे मुलांना किंवा नातेवाईकांना जास्तीत जास्त 10,000 रुपये प्रति महिना निर्वाह भत्ता देण्याचे आदेश देऊ शकते. हा भत्ता प्रतिवादीला सर्व मार्गांनी मिळणारे एकत्रित मासिक उत्पन्न भागिले कुटुंबातील व्यक्ती (अर्जदारासह) या प्रमाणे येणाऱ्या रक्कमेपेक्षा जास्त असणार नाही.
समेट आणि सुनावणी प्रक्रिया कशी होणार?
अर्ज प्राप्त झाल्यानंतर न्यायाधिकरण प्रतिवादीला कारणे दाखवा नोटीस बजावते. दोन्ही पक्षांच्या सहमतीने प्रकरण समेट अधिकाऱ्याकडे (Conciliation Officer) पाठवून परस्पर समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो.
नोटीसला उत्तर नाही दिलं तर?
जर प्रतिवादी नोटीसला उत्तर देत नसेल किंवा सुनावणीच्या दिनांकास अनुपस्थित राहिला, तर न्यायाधिकरण अर्जदाराचा पुरावा ग्राह्य धरून किंवा योग्य ती चौकशी करून एकतर्फी (Ex-parte) कारवाई करते आणि अर्ज निकाली काढते.
म्हणजेच आता आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणं महागात पडणार आहे.
पालकांची सेवा करा… हा फक्त संस्कार नाही, आता कायदा आहे!
–
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

दिनांक : २३ नोव्हेंबर २०२६ Dr.Pintu Paul Distric repoter Vande bharat live tv news बाटलीबंद पाणी किती सुरक्षित?…
पूरी खबर पढ़ें →
भरतपुर रुदावल रुदावल नव निर्वाचित सरपंच सुभाष कटारा ने किया पदभार ग्रहण
पूरी खबर पढ़ें →
ਪ੍ਰਤੀਕ ਸੇਠੀ ਰਿਪੋਰਟ ਵੰਦੇ ਭਾਰਤ ਨਿਊਜ਼ ਫਰੀਦਕੋਟ: 27 ਨਵੰਬਰ 2026 ਨੂੰ ਰਾਤ 8 ਵਜੇ ਕੋਟਕਪੂਰਾ ਵਿਖੇ ਪੰਜਾਬ ਸਰਕਾਰ…
पूरी खबर पढ़ें →
*धौला में नवनिर्वाचित सरपंच संज्या, उपसरपंच सत्यप्रकाश व वार्ड पंचों ने वैदिक मंत्रोच्चार से किया कार्य ग्रहण* *त्रिवेणीधाम…
पूरी खबर पढ़ें →
गुरबाणी और शबद-कीर्तन से गूंजा माधव नगर, श्रद्धा के साथ निकली ‘गुरु की मेहर वाली प्रभात फेरी’ श्री…
पूरी खबर पढ़ें →
सागर, वन्दे भारत लाइव टीवी न्यूज रिपोर्टर सुशील द्विवेदी,8225072664* मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव की अध्यक्षता में हुई कैबिनेट…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।