Dr.Pintu Paul Distric Repoter Vande Bharat live tv news
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनांच्या वतीने आज दिनांक 24 नोव्हेंबर 2026 रोजी शहरात कडकडीत बंद पाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी चंद्रपूर शहरातील शेकडो ऑटो रिक्षा चालकांनी आपल्या ऑटो रिक्षा बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला. चंद्रपूर शहर महानगरपालिका ऑटो स्टँड परिसरात चालकांनी एकत्र येत आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या :
1. शहरात सुरू असलेली अवैध बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करावी.
2. रॅपिडो, ओला, उबर सारख्या ॲप वरील बाईक टॅक्सीचा पर्याय तात्काळ हटवावा.
3. परवानाधारक ऑटो चालकांचे हित लक्षात घेऊन अवैध वाहतुकीवर कडक कारवाई करावी.
4. इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा व परमिट संदर्भातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत.
अवैध बाईक टॅक्सीमुळे परवानाधारक ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवसभर मेहनत करूनही घरखर्च भागणे कठीण झाले आहे, अशी व्यथा यावेळी चालकांनी मांडली.
प्रशासनाने आमच्या मागण्यांवर तात्काळ ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलक संघटनांच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात शहरातील सर्व ऑटो रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.