Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
A2Z सभी खबर सभी जिले की

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची शिकस्त; तीन पिंजरे, थर्मल ड्रोन अन्‌ गस्त वाढली

01 Sep 2026, 10:25 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची शिकस्त; तीन पिंजरे, थर्मल ड्रोन अन्‌ गस्त वाढली - अहमदनगर, महाराष्ट्र

साडेतीन वर्षांचा अद्विक साक्षीच्या प्रसंगावधानामुळे बालंबाल बचावला; सलग तीन घटनांनी हणमंतगाव परिसरात दहशत

सोनगाव (प्रतिनिधी) : राहाता तालुक्यातील हणमंतगाव परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार सुरूच असून, सलग तीन घटनांमुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रविवारी अवघ्या साडेतीन वर्षांच्या अद्विक अजिंक्य घोलप या चिमुकल्याच्या दिशेने बिबट्याने झेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कु. साक्षी सुनील घोलप हिच्या प्रसंगावधानामुळे अद्विकचा जीव बालंबाल बचावला. या घटनेनंतर वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी मोहीम तीव्र केली असून तीन पिंजरे, थर्मल ड्रोन आणि वाढीव गस्तीचा आधार घेतला आहे.
हणमंतगावातील मोहटा देवी, फिरस्तीआई मंदिर परिसर, दशक्रिया विधी घाट, नदीकाठ तसेच घोलप वस्ती परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर आढळून येत आहे. ऊस, दाट झाडी आणि उंच पिकांमुळे बिबट्याला लपण्यासाठी पोषक वातावरण मिळत असल्याने त्याचा वावर वाढला आहे. बिबट्याने कोंबड्यांवरही हल्ले केले आहेत.
काही दिवसांपूर्वी नदीकाठच्या शेतात कपाशीवर औषध फवारणी करणारे मच्छिंद्र भाऊसाहेब जेजुरकर यांच्यावर उसातून अचानक बाहेर पडलेल्या बिबट्याने झडप घातली. त्यांच्या आरडाओरडीनंतर शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने बिबट्या पसार झाला. त्यानंतर विलास गोकुळ जेजुरकर यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला.
रविवारी दुपारी अजिंक्य विलास घोलप यांच्या वस्तीवर बिबट्याने कोंबडीवर झडप घातली. त्याचवेळी जवळ खेळत असलेल्या अद्विककडे त्याची नजर गेली. धोका ओळखताच साक्षीने धावत जाऊन अद्विकला उचलून गोठ्यात नेले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनांची गंभीरता लक्षात घेऊन वनविभागाने परिसरात तीन पिंजरे लावले आहेत. नदीकाठचा पिंजरा हलवून घोलप वस्तीवर बसविण्यात आला आहे. बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी थर्मल ड्रोनचा वापर सुरू असून वनपथकाची गस्तही वाढविण्यात आली आहे. वनरक्षक प्रतीक गजेवार, मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के यांच्यासह पथकाकडून पाहणी सुरू आहे.
दरम्यान, बिबट्याच्या दहशतीमुळे मजूर शेतात येण्यास धजावत नसल्याने शेतीची कामे ठप्प होण्याची भीती आहे. महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेची चिंता वाढली असून, बिबट्याला तातडीने जेरबंद करून परिसराला दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

वाराणसी के पिशाचमोचन कुंड पर लगेगा सीसीटीवी और बनेगा ओपन जिम
Chandauli07 Sep

वाराणसी के पिशाचमोचन कुंड पर लगेगा सीसीटीवी और बनेगा ओपन जिम

वाराणसी के पिशाचमोचन कुंड पर लगेगा सीसीटीवी और बनेगा ओपन जिम काशी के पौराणिक जलस्रोतों, कुंडों और तालाबों…

पूरी खबर पढ़ें →
फोन पर बात करने को लेकर पति-पत्नी में विवाद, लोहे की रॉड से हमला; पत्नी की मौत
Kanpur Dehat07 Sep

फोन पर बात करने को लेकर पति-पत्नी में विवाद, लोहे की रॉड से हमला; पत्नी की मौत

कानपुर देहात। अकबरपुर कोतवाली क्षेत्र में रविवार सुबह पति-पत्नी के बीच फोन पर बात करने को लेकर हुए…

पूरी खबर पढ़ें →
कांठ के पूर्व विधायक राजेश कुमार सिंह उर्फ चुन्नु के नेतृत्व में आयोजित होगी ‘जय जवान-जय किसान तिरंगा महायात्रा’
Moradabad07 Sep

कांठ के पूर्व विधायक राजेश कुमार सिंह उर्फ चुन्नु के नेतृत्व में आयोजित होगी ‘जय जवान-जय किसान तिरंगा महायात्रा’

विधानसभा 25-कांठ में पूर्व विधायक राजेश कुमार सिंह उर्फ चुन्नु के द्वारा आगामी 28 सितंबर 2026 को शहीद-ए-आजम…

पूरी खबर पढ़ें →
बस्ती: झोलाछाप ‘बंगाली डॉक्टर’ के गलत इंजेक्शन से 10 दिन के भीतर दूसरी मौत, 17 वर्षीय किशोर की गई जान.
Basti07 Sep

बस्ती: झोलाछाप ‘बंगाली डॉक्टर’ के गलत इंजेक्शन से 10 दिन के भीतर दूसरी मौत, 17 वर्षीय किशोर की गई जान.

बस्ती में मौत के सौदागर: स्वास्थ्य विभाग की सुस्ती और झोलाछाप 'बंगाली डॉक्टरों' के शिकंजे में उजड़ रही…

पूरी खबर पढ़ें →
‘चीफ’ गेस्ट ‘डीएम’ और ‘सीडीओ’ नहीं, बल्कि एमएलसी प्रतिनिधि हरीश सिंह और सरोज मिश्र रहे.
Basti07 Sep

‘चीफ’ गेस्ट ‘डीएम’ और ‘सीडीओ’ नहीं, बल्कि एमएलसी प्रतिनिधि हरीश सिंह और सरोज मिश्र रहे.

बस्ती के कलेक्ट्रेट सभागार में शिक्षक दिवस पर आयोजित सम्मान समारोह से शिक्षा विभाग और जिला प्रशासन के…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!