कोरचीत हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ३४ जण ताब्यात
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


समीर वानखेड़े ब्यूरो चीफ:
गडचिरोली, जिल्ह्यात कोरची तालुक्यातील नांगपूर गावाजवळील जंगलात मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कथित अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगुल पोलिसांनी आज पहाटे सुमारास धाड टाकली. या कारवाईत ३४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, ४ लाख ४१ हजार ५०० रुपये रोख रकमेसह २३ चारचाकी आणि ५ दुचाकी वाहनांसह एकूण १ कोटी ५० लाख ९७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये एकूण ३६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार भरविल्याचा आरोप असलेले परमेश्वर लोहंबरे आणि मिथुन तांबेकर हे दोघे फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. परमेश्वर लोहंबरे हा काँग्रेस पक्षाचा जिल्हा महासचिव आहे, हे येथे उल्लेखनीय.
पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंह दुल्हत, हवालदार सतीश कत्तीवार, तुषार खोब्रागडे, बापू कुम्मरी तसेच कोटगुल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विवेक वायकर, सहायक फौजदार भजनराव कोडापे, अंमलदार संदीप बागडे व किशोर बावणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विवेक वायकर करीत आहेत.
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

*बल्लारपूर, 20 सितंबर 2026* शोतोकान कराटे-डू एसोसिएशन द्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य स्तरीय कराटे स्पर्धा रविवार, 20 सितंबर 2026…
पूरी खबर पढ़ें →
पुलिस अधीक्षक टीकमगढ़ श्री सुधीर कुमार अग्रवाल के निर्देशन में जिले में चोरी एवं वाहन चोरी की घटनाओं…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsराज्यपाल ने श्री बंशीधर मंदिर में की पूजा-अर्चना, झारखंड की सुख-शांति व समृद्धि की कामना वैदिक मंत्रोच्चार के…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsदपूम. रेलवे नागपुर रेल मंडल अंतर्गत आने वाली बहुप्रतीक्षित वड़सा- गड़चिरोली ब्राॅडगेज रेल लाइन अब अपने अंतिम चरण…
पूरी खबर पढ़ें →
संगमनेर शहर मालपाणी उद्योग समूह गणेश विसर्जन पारंपारिक कलाकृती नृत्य व डान्सिंग देखावे लोकांन पुढे सादर केले विसर्जन…
पूरी खबर पढ़ें →
# 🚨🔥 बड़ी खबर | लखनऊ डायोसेसन ट्रस्ट के प्रबंधन विवाद में NCLT का बड़ा अंतरिम आदेश, पूर्व…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।