Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
A2Z सभी खबर सभी जिले की

युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासह विविध क्षेत्रांत सहभाग वाढविण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

23 Aug 2026, 08:18 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
HQZgI1dbUAAwRTU 1336x2048 1

समीर वानखेड़े ब्यूरो चीफ: 

शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढविण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल त्यासोबत स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये चर्चा करून चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी आज दिली.

WhatsApp Image 2026 08 23 at 3.23.56 PM 1 1536x1023 1

रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मंथन फॉर युवा’ या या उपक्रमांतर्गत ढोल ताशा पथकाचा जागतिक विक्रम तसेच विविध क्षेत्रातील आयकॉन असलेल्या व्यक्तींसोबत थेट संवाद, नशामुक्त महाराष्ट्र व देश यासाठी युवकांना शपथ आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २५ हजार पेक्षा जास्त युवक व युवतींनी सहभाग नोंदवला.

HQZgI2mb0AAXVl4 1536x1227 1

महाराष्ट्राची परंपरा असलेल्या ढोल ताशा पथकाने एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये जागतिक विक्रम नोंदविला आहे. आधार नोंद असलेल्या ५८५ ध्वजधारकांच्या या उपक्रमामुळे जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविक्रम केल्याबद्दल संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.

HQZmO7lbQAAWr0B 1536x864 1

२५ हजारांपेक्षा जास्त युवकांच्या साक्षीने हा उपक्रम पूर्ण झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजची युवा पिढी सर्वच क्षेत्रात आपल्या कौशल्याने नावलौकिक मिळवीत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक सहभाग लाभलेल्या ध्वजधारकांच्या समावेशाबद्दल विश्वविक्रमामध्ये नोंद झाली असून यापूर्वी २६० ध्वज धारकांच्या समावेश असलेला विक्रम आज मोडीत निघाला आहे.

HQZgR29aQAASJIl 1024x819 1

सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक रिधिमा पाठक यांनी युवकांचे आयकॉन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत क्रिकेटपटू तिलक वर्मा, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेते दिलीप महादू गावित, अर्जुन देशपांडे, किरण शहाजी यांच्याशी संवाद साधताना विविध क्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रेरणा व अनुभव युवकांसमोर मांडले.

WhatsApp Image 2026 08 23 at 3.23.55 PM 1 1024x682 1

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संविधानामुळेच लोकशाही प्रगल्भ झाली आहे. आपल्या लोकशाहीमुळेच मला नगरसेवक, महापौर, आमदार आणि मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. संविधानामुळेच आपल्या आकांक्षा व विश्वास पूर्ण करण्यासाठी कुणीही थांबू शकत नाही असे सांगत ते आपल्या राजकीय व सामाजिक वाटचालीबाबत युवकांसमोर व्यक्त झाले. स्टार्टअप संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, युवकांना शासनाची संपूर्ण मदत करण्याचे धोरण असून स्टार्टअपसाठी इकोसिस्टीम पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या धोरणामध्ये युवकांना शंभर टक्के मदत करण्याचा उद्देश असल्याने युवकांसोबत चर्चा करून आणखी चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.

WhatsApp Image 2026 08 23 at 3.23.56 PM 1024x682 1

मुलांमध्ये असलेल्या सर्वाधिक स्क्रीन टाईम बद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी विचारमंथन सुरू आहे. स्क्रीनवरून मैदानावर कसे वळता येईल याबद्दलही या क्षेत्रातील तज्ञांकडून निश्चित धोरण ठरविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

HQZmIpnaEAAJftx 1024x668 1

 

प्रारंभी मंथन फॉर युवाचे आयोजक रितेश गावंडे यांनी स्वागत करून या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. एक ऑगस्ट एक ते 23 ऑगस्टपर्यंत या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून या उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील आयकॉन म्हणून ओळख असलेल्या युवक व युवतींचा गौरव करून त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची माहिती देण्यात आली. नशा मुक्त भारत या अंतर्गत युवकांना नशा मुक्तीची शपथ देण्यात आली. यामध्ये अमली पदार्थमुक्त जीवनशैली या व्यसनापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा त्यासोबतच अमली पदार्थांचा वापर अथवा विक्री कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही तसेच आपली अमली पदार्थमुक्त युवा पिढी घडविण्यासाठी सक्रिय सहभाग याबद्दल युवकांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शपथ दिली. आयोजक विष्णू चांगदेव यांनी आभार मानले.

 

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

*कराटे स्पर्धा में चमके सेंट पॉल स्कूल के छात्र, राष्ट्रीय स्पर्धा के लिए चयन
Chandrapur22 Sep

*कराटे स्पर्धा में चमके सेंट पॉल स्कूल के छात्र, राष्ट्रीय स्पर्धा के लिए चयन

*बल्लारपूर, 20 सितंबर 2026* शोतोकान कराटे-डू एसोसिएशन द्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य स्तरीय कराटे स्पर्धा रविवार, 20 सितंबर 2026…

पूरी खबर पढ़ें →
टीकमगढ़ पुलिस ने अंतर्राज्यीय मोटरसाइकिल चोर गिरोह का किया पर्दाफाश 07 आरोपी गिरफ्तार, 09 चोरी की मोटरसाइकिल सहित करीब 3.90 लाख रुपये नगदी बरामद
A2Z सभी खबर सभी जिले की22 Sep

टीकमगढ़ पुलिस ने अंतर्राज्यीय मोटरसाइकिल चोर गिरोह का किया पर्दाफाश 07 आरोपी गिरफ्तार, 09 चोरी की मोटरसाइकिल सहित करीब 3.90 लाख रुपये नगदी बरामद

पुलिस अधीक्षक टीकमगढ़ श्री सुधीर कुमार अग्रवाल के निर्देशन में जिले में चोरी एवं वाहन चोरी की घटनाओं…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
A2Z सभी खबर सभी जिले की21 Sep

राज्यपाल ने श्री बंशीधर मंदिर में की पूजा-अर्चना, झारखंड की सुख-शांति व समृद्धि की कामना

राज्यपाल ने श्री बंशीधर मंदिर में की पूजा-अर्चना, झारखंड की सुख-शांति व समृद्धि की कामना वैदिक मंत्रोच्चार के…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Nagpur21 Sep

बहुप्रतीक्षित वड़सा- गड़चिरोली ब्राॅडगेज रेल लाइन का कार्य पूर्ण हो चुका है

दपूम. रेलवे नागपुर रेल मंडल अंतर्गत आने वाली बहुप्रतीक्षित वड़सा- गड़चिरोली ब्राॅडगेज रेल लाइन अब अपने अंतिम चरण…

पूरी खबर पढ़ें →
बड़ी खबर | लखनऊ डायोसेसन ट्रस्ट के प्रबंधन विवाद में NCLT का बड़ा अंतरिम आदेश, पूर्व न्यायमूर्ति लोकपाल सिंह बने प्रशासक
A2Z सभी खबर सभी जिले की21 Sep

बड़ी खबर | लखनऊ डायोसेसन ट्रस्ट के प्रबंधन विवाद में NCLT का बड़ा अंतरिम आदेश, पूर्व न्यायमूर्ति लोकपाल सिंह बने प्रशासक

# 🚨🔥 बड़ी खबर | लखनऊ डायोसेसन ट्रस्ट के प्रबंधन विवाद में NCLT का बड़ा अंतरिम आदेश, पूर्व…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!