Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Thane

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित पोलीस मित्र समितीकडून ‘एक शाबासकीची थाप’ उपक्रमाला उत्स्फूर्त सुरुवात

25 Sep 2026, 11:24 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित पोलीस मित्र समितीकडून ‘एक शाबासकीची थाप’ उपक्रमाला उत्स्फूर्त सुरुवात - ठाणे, महाराष्ट्र

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित पोलीस मित्र समितीकडून ‘एक शाबासकीची थाप’ उपक्रमाला उत्स्फूर्त सुरुवात

कोकण विभागीय अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बांधवांचा सन्मान; वागळे इस्टेट व नौपाडा पोलीस ठाण्यात उपक्रमाला प्रतिसाद

ठाणे : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, सुरक्षा कर्मचारी व इतर सेवाभावी कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी सुरू केलेल्या ‘एक शाबासकीची थाप’ या अभिनव उपक्रमाला संघ संचलित पोलीस मित्र समितीने उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित पोलीस मित्र समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व नेतृत्वाखाली या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे पीआय श्री. अशोक उत्तेकर साहेब यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पोलीस दलाच्या सेवाभावी आणि कर्तव्यनिष्ठ कामाची दखल घेत पोलीस मित्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या प्रसंगी पोलीस मित्र समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष राजेश चव्हाण, उपाध्यक्ष लक्षण मन्नम, सचिव इरफान कुरेशी यांच्यासह समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच नौपाडा पोलीस स्टेशनचे पीआय/पीएसआय योगेश आव्हाड यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवेलाही या उपक्रमातून सलाम करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या काळात लाखो नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळताना पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र रस्त्यावर तैनात असतात. नागरिक उत्सव आनंदात साजरा करत असताना त्यामागे पोलीस प्रशासनाचे मोठे योगदान असते. त्यांच्या या योगदानाची समाजाने दखल घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हीच या उपक्रमामागील प्रमुख भावना आहे.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित पोलीस मित्र समितीने सर्वप्रथम पुढाकार घेत उपक्रम प्रत्यक्षात सुरू केल्याने संघाच्या या सामाजिक उपक्रमाला नवी दिशा मिळाली आहे. येत्या काळात विविध पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस, सुरक्षा कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा मानस समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

“पोलीस आणि समाज यांच्यातील मैत्रीचे नाते अधिक दृढ करणे, त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच पोलीस मित्र समितीचा उद्देश आहे.”

‘एक शाबासकीची थाप’ या उपक्रमातून पोलीस मित्र समितीने समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

**All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

सहारनपुर SSP ने शुक्रवार की परेड की सलामी लेकर पुलिस लाइन का किया सघन निरीक्षण
A2Z सभी खबर सभी जिले की25 Sep

सहारनपुर SSP ने शुक्रवार की परेड की सलामी लेकर पुलिस लाइन का किया सघन निरीक्षण

# 🚨🔥 बड़ी खबर | सहारनपुर SSP ने शुक्रवार की परेड की सलामी लेकर पुलिस लाइन का किया…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Nagpur25 Sep

विधान परिषद की नागपुर स्नातक सीट के लिए 23 अक्टूबर को चुनाव होंगे

महाराष्ट्र विधान परिषद की नागपुर स्नातक सीट के लिए निर्वाचन आयोग ने 23 अक्टूबर की तिथि निर्धारित कर…

पूरी खबर पढ़ें →
कॅन पॅक कंपनी के 280श्रमिकों की मजदूरी में प्रतिवर्ष बीस हजार रुपये की वृद्धि हुई, जिससे श्रमिकों की खुशी दोगुनी हो गई। 18 महीने बाद श्रमिकों का संघर्ष सफल हुआ।
Chhatrapati Sambhajinagar25 Sep

कॅन पॅक कंपनी के 280श्रमिकों की मजदूरी में प्रतिवर्ष बीस हजार रुपये की वृद्धि हुई, जिससे श्रमिकों की खुशी दोगुनी हो गई। 18 महीने बाद श्रमिकों का संघर्ष सफल हुआ।

वालुज महानगर प्रतिनिधि; औद्योगिक क्षेत्र में स्थित कैन पैक प्राइवेट लिमिटेड। कंपनी के एल्युमीनियम और ग्लास विभाग के…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!