अंमली पदार्थ व तंबाखूविरोधी कारवाईला वेग शाळा- महाविद्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम ; जनजागृतीवरही भर

अंमली पदार्थ व तंबाखूविरोधी कारवाईला वेग
शाळा- महाविद्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम ; जनजागृतीवरही भर
विलास केजरकर भंडारा.
भंडारा, दि. ५ : जिल्ह्यात अंमली पदार्थांचे सेवन, विक्री व अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले.
ते जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन समिती (NCORD)च्या बैठकीत अंमली पदार्थ व तंबाखूविरोधी कारवाईचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्यासोबतच जनजागृतीच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक व्यापक करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शाळा-महाविद्यालय परिसरात विशेष तपासणी शाळा व महाविद्यालय परिसरात सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री तसेच सेवन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, पोलीस विभाग व शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने विशेष पथके तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. या पथकांमार्फत ऑक्टोबर महिन्यापासून नियमित शाळा व महाविद्यालय परिसरात तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीवर भर NDPS कायद्यांतर्गत अंमली पदार्थांविरोधात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, पोलीस विभाग आणि व्यसनमुक्ती केंद्रांच्या समन्वयाने विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम तसेच व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आले.
विविध विभागांच्या समन्वयातून प्रभावी कार्यवाही बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रतिनिधी डॉ. रत्नाकर बांडेयुचे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, समाज कल्याण, कृषी विभाग, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, स्थानिक गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक, दहशतवाद विरोधी शाखा, जिल्हा माहिती कार्यालय तसेच विविध व्यसनमुक्ती केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अंमली पदार्थमुक्त भंडारा जिल्ह्याच्या दिशेने प्रतिबंधात्मक कारवाई, जनजागृती आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून सातत्यपूर्ण कार्यवाही करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
**All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।







