नानाचे जाणे हे समाजाची मोठी हानी

नानाचे जाणे हे समाजाची मोठी हानी
आज सकाळी टीव्ही लावताच नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी पडद्यावर आदळली. अनपेक्षित आलेल्या या बातमीने काहीकाळ चित्त विचलित केले. नाना हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित नट होते. त्यांच्या अभिनयाबाबत काही वेगळे सांगायची गरजही नाही. त्यांनी सिनेमा. नाटकातून विविध भूमिका प्राण ओतून साकारल्या. त्यामुळे त्यांच्या निधनाने कला क्षेत्राचे नुकसान झाले हे खरेच आहे. परंतु त्याही पेक्षा जास्त नुकसान समाजाचे झाले आहे.
मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना उमरखेडला वसंत टाँकीजमध्ये हमिदाबाईची कोठी हे नाटक पाहिले. नानाला त्या नाटकात मी प्रथम पाहिले. त्यावेळी ते नामांकित नट नव्हते. त्या नाटकात त्यांच्या सोबत विजया मेहता, निना जोशी, अशोक सराफ यांच्या सारखे दिग्गज नट होते. नाना अत्यंत नवखे होते. नाटकाला आलेले सर्वजण अशोक सराफाचे नाव पाहून नाटकाला आले होते. पण त्या नाटकात अत्यंत नवखा असलेल्या नानांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. नाना पाटेकर यांची माझी ओळख नव्हती. त्यामुळे मित्रत्वाचे संबंध वगैरेचा प्रश्नच नाही. परंतु काही वेळा प्रत्यक्ष गाठभेट झाली. तीही केवळ औपचारिक नमस्कार, नमस्कार या मर्यादेतच. त्यांची पहिली भेट झाली ती आनंदवनात बाबा आमटे यांच्याकडे. नाना आणि बाबाचे नाते सर्वानाच माहिती आहे. त्यामुळे ते अनेकदा आनंदवनात येत असत. त्यानंतर चंद्रपुरच्या पत्रकारांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला ते आले तेव्हाही गाठभेट झाली. त्यानंतर मात्र प्रदीर्घकाळ त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नाही. २०१५ च्या दरम्यान त्यांनी जेव्हा नाम फाऊंडेशन सुरु केले तेव्हा त्यांची भेट झाली. आमचे मित्र केशव घोणसे पाटील यांनी नांदेडला कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना भेटण्याचा योग आला. नानाची ती भेट आता अंतिम ठरली. नाना कलावंत म्हणून श्रेष्ठ होतेच, त्याबद्दल वाद असण्याचे कारण नाही. परंतु नाना जे मला भावले ते त्यांच्यातील माणुसकीमुळे. खरं म्हणजे मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीत नानांनी भूमिका केलेले जवळपास सर्वच चित्रपट हिटच झाले. त्यांच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या. त्यांचा या क्षेत्रात असा दबदबा होता की, एखाद्या भूमिकेसाठी ते म्हणतील तेवढा पैसा त्यांना निर्माते देत असतील. त्यामुळे एक कलावंत म्हणून ते अत्यंत चैनीचे जीवन जगू शकले असते. त्यांना कशाचीही कमतरता पडली नसती. त्यांचा राजकारणाचा पिंड नव्हता. त्यामुळे त्यांना कधी मतेही मागायची नव्हती. त्यामुळे त्यांना लोकांच्या सुखदुखाशी काही घेणेदेणेही नव्हते. असे असतानाही नानांनी किर्ती, यश, प्रसिध्दी, पैसा याकडे पाठ फिरवून केवळ आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी नामची स्थापना केली. त्यातून हजारो शेतक-यांना मदतीचा हात दिला. लोकसभा, विधान सभेत शेतक-यांचे पूत्र असलेले, शेतक-यांचा कैवार घेणारे अनेक प्रतिनिधी शेकडोंच्या संख्येने बसतात. परंतु नाना सारखा शेतक-यांचा कळवळा त्यांना कधीही आलेला दिसला नाही. प्रसिध्दीच्या शिखरावर असताना, दारी हात जोडून सारी सुखे उभी असताना नानांनी जी सामाजिक बांधिलकीची भावना जोपासली ती अधिक महत्वाची आहे. नामच्या माध्यमातून त्यांनी जे केले ते अत्यंत निरपेक्ष भावनेने केले. कलावंत यापूर्वीही होऊन गेले, नंतरही अनेक होतील. नानासारखे किंवा त्यापेक्षाही अधिक चांगले नट होतील. परंतु आपण या समाजाचा एक घटक आहोत. या समाजाचे काही देणं लागतो ही भावना जोपासणारे नट होतील का हा खरा प्रश्न आहे. यापूर्वी डाँ. श्रीराम लागू, निळू फुले यांनी सामाजिक बांधिलकी दाखवली. तेव्हाचा काळही थोडा वेगळा होता. आजच्या इतके पैशाला महत्व आलेले नव्हते. आजकाल फक्त पैशासाठी अहोरात्र धडपड करणारे लोक पाहताना समाजाचे किती अधःपतन झाले याचेच जास्त दर्शन होते. सामाजिक बांधिलकी कोणात दिसत नाही. अशा काळात नानांनी ती नुसती जोपासली नाही तर वास्तवात उतरवली. समाजासाठी आपण काही करतोय याचा त्यांनी कधी गवगवा केला नाही. कधी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला नाही. जे काही केले त्यातून आपला फायदा काय याचाही विचार केला नाही. असा माणूस जाणे हे समाजाचे नुकसान आहे. अगोदर अशी माणसं अत्यंत दुर्मिळ होत चाललीत. त्यातीलही नानासारखी माणसं जात असतील तर कलेपेक्षाही ते समाजाचे जास्त नुकसान आहे. नानाच्या मृत्युकडे या दृष्टीने पाहिले पाहिजेत. नानांना भावपूर्ण श्रध्दांजली.
विनायक एकबोटे
ज्येष्ठ पत्रकार नांदेड
7020385811
दि. ८-१०-२०२६
[08/10, 18:58] devashishtokekar05: **All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।






