इमाव, विमाप्र व विजाभज विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी सुरू; ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

इमाव, विमाप्र व विजाभज विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी सुरू; ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
विलास केजरकर भंडारा.
भंडारा, दिनांक १५ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागासवर्गीय (इमाव), विमुक्त जाती व भटक्या जमाती (विमाप्र) तसेच विशेष मागास प्रवर्ग (विजाभज) विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनांसाठी केंद्र शासनाच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) आणि राज्य शासनाच्या महाडीबीटी २.० पोर्टलद्वारे अर्ज सादर करावेत. NSP पोर्टलवर अर्ज नोंदणीची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ असून, शाळा व विद्यालय स्तरावर अर्ज तपासणीची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२६ आहे.
*मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी NSP वर अर्ज*
इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांनी ‘PM YASASVI Pre Matric Scholarship Scheme for OBC, EBC & DNT Students’ या योजनेसाठी NSP पोर्टलवर अर्ज नोंदणी करावी.
महाडीबीटी पोर्टलवर मॅट्रिकपूर्व स्तरावरील इतर योजनांसाठीही अर्ज करता येणार आहेत. इयत्ता पाचवी ते आठवीतील मुली तसेच पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या नववी व दहावीतील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू आहे. याशिवाय माध्यमिक शाळांमधील विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद गुणवत्ता शिष्यवृत्ती, मुंबईपुरती गुणवंत शिष्यवृत्ती, पात्र विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क भरण्याची योजना तसेच सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता या योजनांचा समावेश आहे.
*मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी विविध योजना*
इयत्ता दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्गीय मुलींसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी NSP पोर्टलवर अर्ज करावा. सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात अभ्यासक्रम सुरू झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्जही या योजनेसाठी NSP पोर्टलवरच सादर करावेत.
महाडीबीटी २.० पोर्टलवर मॅट्रिकोत्तर स्तरावरील विविध योजनांसाठी अर्ज नोंदणी करता येणार आहे. यामध्ये इयत्ता अकरावी व बारावीतील विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या व संलग्न वसतिगृहात राहणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता, व्यावसायिक प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) तसेच शासकीय व खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क परतफेड या योजनांचा समावेश आहे.
मागील शैक्षणिक सत्रात भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेतलेल्या आणि शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये त्याच विद्यालयात तृतीय, चतुर्थ किंवा पुढील वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी नूतनीकरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणी करावी. विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी संबंधित शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व पात्रता तपासून विहित पोर्टलवर अर्ज सादर करावेत. तसेच संबंधित शाळा, विद्यालये व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी व आवश्यक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.
[16/10, 06:51] devashishtokekar05: **All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।





