Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Gadchiroli

अहेरीत खळबळ! भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांना १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना ACB ने पकडल्याचा आरोप!

11 Nov 2026, 09:24 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
अहेरीत खळबळ! भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांना १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना ACB ने पकडल्याचा आरोप! - गडचिरोली, महाराष्ट्र

अहेरीत खळबळ! भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांना १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना ACB ने पकडल्याचा आरोप!

अहेरी / गडचिरोली : अहेरी नगरपंचायतीतील विजेच्या कामांच्या ठेक्याच्या मोबदल्यात कमिशन मागितल्याच्या कथित प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने अहेरीच्या मुख्य बाजारपेठेत १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याचा दावा समोर आला आहे.

ठेकेदाराच्या तक्रारीनंतर ACB चा सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी नगरपंचायतीच्या विजेच्या कामांच्या ठेक्याच्या संदर्भात संबंधित ठेकेदाराकडे १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या मागणीला विरोध करत ठेकेदाराने थेट गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर ACB अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करून सापळा रचला. गुरुवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास अहेरीच्या मुख्य बाजारपेठेत लाचेची रक्कम स्वीकारताना अमोल गुडेल्लीवार यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, ACB उपअधीक्षक विक्रांत सगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.

निवडणुकीतील पराभवानंतर स्वीकृत नगरसेवकपद; राजकीय चर्चेला उधाण

अमोल गुडेल्लीवार हे नगरपंचायत निवडणुकीत पराभूत झाले होते. मात्र, त्यानंतर भाजपकडून त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. तसेच ते माजी राज्यमंत्री अम्बरीशराव आत्राम यांचे निकटवर्तीय समर्थक असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

या कथित लाचखोरीच्या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले असून, लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

विकासकामांतील कमिशनखोरीला आळा कधी?

या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांकडून काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

– विकासकामांच्या ठेक्यांमध्ये कमिशनखोरीचे प्रकार कितपत वाढले आहेत?
– जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता कधी येणार?
– या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का?
– संबंधित ठेक्यांची आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी होणार का?

पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन ही जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

टीप : सदर प्रकरण तपासाधीन असून, अमोल गुडेल्लीवार यांच्यावरील आरोपांची न्यायालयात अद्याप दोषसिद्धी झालेली नाही. अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांना निर्दोषत्वाचा कायदेशीर लाभ लागू राहील.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

खाकी वर्दी की गरिमा पर फिर उठे सवाल! अयोध्या पुलिस के कांस्टेबल को ही पुलिस सहायता की जरूरत पड़ गई?**
A2Z सभी खबर सभी जिले की12 Nov

खाकी वर्दी की गरिमा पर फिर उठे सवाल! अयोध्या पुलिस के कांस्टेबल को ही पुलिस सहायता की जरूरत पड़ गई?**

🚨🔥 **बड़ी खबर | खाकी वर्दी की गरिमा पर फिर उठे सवाल! अयोध्या पुलिस के कांस्टेबल को ही…

पूरी खबर पढ़ें →
बिहार के दरभंगा जिले के तारडीह प्रखंड की पोखरभिंडा पंचायत में जमीन और अतिक्रमण को लेकर विवाद गहराता जा रहा है।
Bhagalpur12 Nov

बिहार के दरभंगा जिले के तारडीह प्रखंड की पोखरभिंडा पंचायत में जमीन और अतिक्रमण को लेकर विवाद गहराता जा रहा है।

बिहार के दरभंगा जिले के तारडीह प्रखंड की पोखरभिंडा पंचायत में जमीन और अतिक्रमण को लेकर विवाद गहराता…

पूरी खबर पढ़ें →
स्लग्न,कैमूर में बेटे की शादी का कार्ड बांटने निकले पिता की सड़क हादसे में मौत, घर में पसरा मातम
Kaimur (Bhabua)12 Nov

स्लग्न,कैमूर में बेटे की शादी का कार्ड बांटने निकले पिता की सड़क हादसे में मौत, घर में पसरा मातम

डेस्क,बिहार कैमूर, ।।स्लग्न,कैमूर में बेटे की शादी का कार्ड बांटने निकले पिता की सड़क हादसे में मौत, घर…

पूरी खबर पढ़ें →
हादसों के शिकार लोगों के लिए संकटमोचन, रुग्णसेवा में मानवता के देवदूत! रमेश देशमुख के सेवाभावी कार्यों का सम्मान; जन्मदिवस
Washim12 Nov

हादसों के शिकार लोगों के लिए संकटमोचन, रुग्णसेवा में मानवता के देवदूत! रमेश देशमुख के सेवाभावी कार्यों का सम्मान; जन्मदिवस

हादसों के शिकार लोगों के लिए संकटमोचन, रुग्णसेवा में मानवता के देवदूत! रमेश देशमुख के सेवाभावी कार्यों का…

error: Content is protected !!