नागपूरमध्ये शिक्षक दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


नागपूरमध्ये शिक्षक दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू; दिवाळीच्या दिवशी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ! नागपूर : दिवाळीच्या सणादरम्यान नागपूर शहरातील बेसा परिसरातील रेवतीनगर येथे एका शिक्षक दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष गणवीर आणि सोनाली गणवीर असे मृत दाम्पत्याचे नाव असून दोघेही गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड परिसरात शिक्षक म्हणून कार्यरत होते.
ऑगस्ट २०२६ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. दिवाळीच्या सुटीनिमित्त हे दाम्पत्य नागपूर येथे आले असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त आहे.
घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेचे नेमके कारण काय, याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.
तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील सत्य समोर येणार आहे. शिक्षक दाम्पत्याच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे शैक्षणिक क्षेत्रासह नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

जिस पुलिस पर लोगों की सुरक्षा की जिम्मेदारी है, उसी पर अब एक युवक ने बदसलूकी और गाली-गलौज…
पूरी खबर पढ़ें →
बिहार के अररिया जिले के कुआरी थाना क्षेत्र में शनिवार सुबह एक अप्रिय घटना सामने आई। पहुंशी हाईस्कूल…
पूरी खबर पढ़ें →
🚨 ट्रेन में सीट नहीं मिली तो युवक ने पार की हदें! इंजन के ऊपर चढ़कर बैठ गया…
पूरी खबर पढ़ें →
चोर जामिनावर मोकाट, मालक मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत; चोरीची क्रूझर गेली कुठे? धनांजा पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले…
पूरी खबर पढ़ें →
(सहारनपुर) जमीन पर कथित तौर पर अवैध कब्जे का विरोध करने पर पांच लोगों ने घर में घुसकर…
पूरी खबर पढ़ें →
सिद्धार्थनगर भारत-नेपाल सीमा पर 43वीं वाहिनी सशस्त्र बल (एसएसबी) की टीम ने जवानों के खिलाफ कार्रवाई करते हुए…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।