12 गावांच्या शेतकऱ्यांनी घेतली सुधीर भाऊंची भेट “आम्हाला कोणताही मोबदला नको, आम्हाला फक्त आमची शेती हवी आहे!”
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


दिनांक : २३ नोव्हेंबर २०२६ | Dr.Pintu Paul Distric Repoter Vande Bharat Live Tv
12 गावांच्या शेतकऱ्यांनी घेतली सुधीर भाऊंची भेट
"आम्हाला कोणताही मोबदला नको, आम्हाला फक्त आमची शेती हवी आहे!"
तालुका : 12 गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सुधीर भाऊंच्या भेटीला पोहोचले. शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितलं – लाल दिव्याच्या गाडीसाठी नाही, तर लाल रक्ताच्या माणसाच्या सेवेसाठी तुम्ही काम करता, म्हणूनच तुमच्यावर आमचा विश्वास आहे.
काय आहे शेतकऱ्यांचा आरोप?
1. 32 (2) ची नोटीस : 12 गावांतील शेतकऱ्यांना 32 (2) ची नोटीस वाटप सुरू आहे.
2. शेतकऱ्यांनी SDO कडे लेखी उत्तर दिलंय – MIDC ला आमचा ठाम विरोध आहे, आम्हाला कुठलाही मोबदला नको.
3. जनसुनावणी : 6 गावांत जनसुनावण्या झाल्या, 6 गावांच्या अजून बाकी आहेत.
4. तरीही MIDC अधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षणाच्या नावावर जमिनीचं मोजमाप सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
5. 12 ही गावांचे ग्रामपंचायत ठराव : शेतकऱ्यांनी 12 ही गावांचे ठराव दिले – एक कोटी रुपये दिले तरी मान्य नाही, आम्हाला मोबदला नको, आम्हाला आमची शेतीच पाहिजे.
करंजी MIDC चं उदाहरण दिलं!
शेतकरी प्रतिनिधींनी सांगितलं – गोंडपिपरी तालुक्यातील करंजी MIDC ला 35 वर्षं झाली. 70 हेक्टर जागा आहे, तिथं एकही उद्योग कुठल्याच सरकारला आणता आला नाही. मग 35 वर्षांत करंजीला उद्योग येत नसेल, तर आमच्या 10,000 एकरवर कुठला उद्योग येणार? आमचं कुठलं भलं होणार?
शेतकऱ्यांची ठाम भूमिका :
"आम्ही 100% इथं उध्वस्त होऊ. आम्हाला विकास नको, उद्योग नको, रोजगार नको – आम्हाला आमची शेती पाहिजे!"
शेतकऱ्यांनी सुधीर भाऊंना विनंती केली की, येणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न विधानसभेत मांडा. तुमच्या केवळ एका फोनवर तहसीलदाराला पत्र काढावं लागलं, तुम्ही विधानसभेत मांडलंत तर 100% आमची MIDC रद्द होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेवटी शेतकरी प्रतिनिधी म्हणाले – आम्ही कुठल्याही पक्षाचे असलो, तरी आयुष्यभर मरेपर्यंत तुमच्या सोबत राहू. फक्त आमची MIDC रद्द झाली पाहिजे!
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

*अरुण मिश्रा के स्थान पर प्रमोद उपाध्याय को मिली मैहर सहायक यंत्री की जिम्मेदारी* *मैहर। विगत दिनों ग्राम…
पूरी खबर पढ़ें →
संवाददाता!लखीमपुर खीरी। पलिया के दो पत्रकारों को जेल भेजे जाने का मामला अब तूल पकड़ता जा रहा है।…
पूरी खबर पढ़ें →
भव्य शोभायात्रा के साथ 24 नवंबर से शुरू होगा श्री बजरंग कटाएघाट मेला मधई मंदिर से दोपहर 2…
पूरी खबर पढ़ें →
हरदोई: पिहानी में धूमधाम से हुआ रावण दहन, जय श्रीराम के जयकारों से गूंजा मैदान; इंस्पेक्टर श्याम नारायण…
पूरी खबर पढ़ें →
लेखक : विजय कुमार, वरिष्ठ पत्रकार 23 नवम्बर 2026, गयाजी : बिहार में ढांचागत विकास की राह में…
पूरी खबर पढ़ें →
हरदोई: पिहानी में धूमधाम से हुआ रावण दहन, जय श्रीराम के जयकारों से गूंजा मैदान; इंस्पेक्टर श्याम नारायण…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।