A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा हरिश शर्मा यांची नियुक्ती

बल्लारपूर मतदारसंघाला जिल्हाध्यक्षपदाचा बहुमान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या शुभेच्छा


समीर वानखेडे:
एकात्म मानवतावाद आणि अंत्योदय या तत्त्वांवर कार्य करणाऱ्या, जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष अर्थात भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदासाठी नुकतीच नियुक्ती जाहीर करण्यात आली. या निवडीअंतर्गत श्री. हरिश शर्मा यांची पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.*

विशेष म्हणजे पुन्हा एकदा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाला जिल्हाध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. हरिश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी पक्ष संघटनेने भक्कम कामगिरी केली असून त्यांची कार्यक्षमता, संघटन कौशल्य आणि व्यापक जनसंपर्क यामुळेच त्यांना पुन्हा ही जबाबदारी देण्यात आली आहे.

या पुनर्नियुक्तीबाबत अभिनंदन व्यक्त करताना राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “श्री. हरिश शर्मा यांच्या सक्षम नेतृत्वामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल आणि पक्षाचे विचार शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोहोचतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Back to top button
error: Content is protected !!