A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरधाराशिव
Trending

शेतकऱ्याचा मालाला योग्य भाव व शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी करणेबाबत.

शेतकऱ्याचा मालाला योग्य भाव व शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी करणेबाबत.

प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि
प्रती,
सन्माननीय आदरणिय महोदय मा. राज्यपाल साहेब
महाराष्ट्र राज्य मुंबई, मार्फत जिल्हाधिकारी साहेब

विषय:- शेतकऱ्याचा मालाला योग्य भाव व शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी करणेबाबत.

महोदय,
साहेब सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात शेतकरी अत्यंत अडचणीत आहे त्यातून आमच्या तूळजापुर तालुक्यातला शेतकरी अतिवृष्टी,दुष्काळ व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकरी आत्महत्या होऊ नयेत म्हणून शेतकऱ्याच्या मालाला सोयाबिनला प्रती क्विंटल दहा हजार रुपये व ज्वारी पाच हजार रुपये प्रमाणे हमी भाव देण्याची शिफारस महायुती शासंनाला करावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळेल व ते साधन होतील व शेतकरी कर्जबाजारातून मुक्त होईल. व सरसकट कर्ज माफी करावी.
तरी मा. महोदय साहेबांनी शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माफ करण्याची व मालाला योग्य भाव देण्याचे निर्देश शासनाला द्यावेत. तसेच शेतकऱ्याचा विमा २०२० पासून ते २०२४ पर्यंत अर्धवट विमा मिळाला आहे तो पूर्ण द्यावा. शेतकऱ्यांचे बँकेचे कर्ज देताना सिव्हिल चेक करणे बंद करावे.
श्री. धैर्यशिल नंदकुमार पाटील
तालुका अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब
तुळजापूर

Vande Bharat live Tv news nagpur
Reporter Devashish Tokekar

Back to top button
error: Content is protected !!