
प्रेस नोट
ग्रामीण प्रतिनीधी नागपूर
*सावनेर नगर पालिकेचा भोंगळ कारभार*
*महापुरुषांच्या पुतळ्याच्या स्वच्छता कडे दुर्लक्ष*
*सावनेर प्रतिनिधी – सूर्यकांत तळखंडे* 9881477824
*सावनेर* शहरातील असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी,महात्मा जोतिबा फुले,रामगणेश गडकरी या महापुरुषांचे स्मारक आहेत. परंतु जेव्हा या महापुरुषांच्या जयंत्या किंवा इतर काही कार्यक्रम असते तेव्हाच नगर परिषदला पुतळ्याची स्वच्छता करण्याचा जाग येते या प्रकारचे कर्तव्य सावनेर नगर परिषद पाळत असल्याचे चित्र सावनेर शहरातील जनतेला दिसल्या मुळे सावनेर तालुक्यातील सामाजिक जनता प्रतिनिधी मयूर पाचभावे व मित्र परिवार यांच्या मार्फत नगर परिषद कार्यालय मध्ये निवेदन देण्यात आले निवेदन मध्ये लक्ष वेधी घेत असतांना नगर परिषद सावनेर मधून टेंडर काढण्यात येते की… संपूर्ण महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता ठेवावी या बाबतीत कोणत्या व्यक्तीला स्वछता कंत्राट मिळालेला आहे पण संबंधित व्यक्ती असमर्थ असल्याचे दिसत असल्यामुळे सामाजिक जनता प्रतिनिधी मयूर पाचभावे व मित्र परिवार यांनी निवेदन देतांनी नम्र विनंती केलेली आहे….की टेंडर आहे पण आपण स्वच्छता का ठेवत नाही जर आपण या बाबतीत दिरंगाई करत असाल तर आम्ही आंदोलन करू असे मयूर पाचभावे मित्र परिवारांकडून निवेदन देण्यात आले.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज,नागपूर
एडिटर
इंडियन कौन्सिल ऑफ प्रेस,नागपूर
जर्नलिस्ट
प्लॉट न:-१८/१९,फ्लॅट नं:-२०१,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -४४००१५









