*शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण; ‘सम्राट अशोक सेने चा जाहीर पाठिंबा**

*शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण; 'सम्राट अशोक सेने चा जाहीर पाठिंबा**
दुष्काळ आढावा विभागीय बैठकीत कृषी मंत्री व अधिकाऱ्यांनी. मोबाईल मध्ये व्यस्त झोपा काढून काजू-बदाम खात मोबाईलवर वेळ घालवल्याचा काम करत आहेत.*मंत्री,आमदार, खासदार व वर्ग-१ अधिकाऱ्यांचे पगार अन् पेन्शन थांबवून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी.
राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही याची शासनाने जबाबदारी घ्यावी.*आकाश दादा शिरसाट*
**अकोला (प्रतिनिधी):**
अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके पूर्णपणे करपून गेली असून शेतकरी अत्यंत हतबल झाला आहे. या बिकट परिस्थितीत अकोला जिल्ह्यात तत्काळ 'कोरडा दुष्काळ' जाहीर करावा, या मुख्य मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या **शेतकऱ्यांच्या बेमुदत मागण्या करणाऱ्या ज्येष्ठ अशोक मानकर साहेब यांच्या उपोषणाला 'सम्राट अशोक सेने'च्या वतीने जाहीर पाठिंबा** देण्यात आला आहे. या आंदोलनात सहभागी होत सम्राट अशोक सेनेचे राज्यध्यक्ष **आकाश दादा शिरसाट** यांनी शासन व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदामांची मेजवानी अन् मोबाईलमध्ये व्यस्तता.
अकोला जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या दुष्काळ आढावा बैठकीवर बोलताना आकाश शिरसाट यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली. *"एकीकडे शेतात पाऊस नसल्याने सोयाबीन, कापूस, तूर जळून खाक झाले आहे. बळीराजा डोळ्यांत अश्रू आणून मदतीची वाट पाहत आहे, तर दुसरीकडे अकोल्यातील बैठकीत कृषिमंत्री आणि विभागीय अधिकारी झोपा काढण्यात, मोबाईल चालवण्यात आणि काजू-बदाम खाण्यात व्यस्त होते! शेतकऱ्यांच्या भीषण वेदना आणि करपलेली पिके दिसत नसतील, तर शासकीय खर्चातून चाललेला हा दिखावा आणि नौटंकी प्रशासनाने तात्काळ बंद करावी,".असा घणाघाती आरोप त्यांनी केला. **सम्राट अशोक सेने'च्या प्रमुख मागण्या:**लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे पगार थांबवा.अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तातडीने 'कोरडा दुष्काळ' जाहीर करण्यात यावा. त्यासाठी राज्यातील सर्व **मंत्री, खासदार, आमदार, सचिव तसेच वर्ग-१ व वर्ग-२ च्या सर्व सनदी अधिकाऱ्यांचे पगार आणि पेन्शन तात्काळ थांबवून** तो निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीसाठी वर्ग करावा.*एकही आत्महत्या होऊ देणार नाही:** राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाला थेट आर्थिक पाठबळ द्यावे. राज्यातील एकाही बळीराजाची आत्महत्या होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी शासनाने स्वीकारली पाहिजे.
**तातडीने कर्ज व वीज बिल माफी:** हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे चालू वर्षाचे पीककर्ज आणि शेतीचे वीज बिल पूर्णपणे माफ करण्यात यावे.
शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे; तो जगला आणि वाचलाच पाहिजे! जर सरकारने या उपोषणाची दखल घेऊन अकोल्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला नाही, तर सम्राट अशोक सेना आणि अकोल्यातील सर्व शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडेल यावेळी उपस्थित शेतकरी वर्ग सामाजिक कार्यकर्ता व राजकीय पदाधिकारी या उपोषणा स्थळी उपस्थित होते.!!
*आकाश दादा शिरसाट*
*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*
**All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।





