Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Bhandara

युवा शेतकऱ्यांनी कृषी उद्योगाकडे वळावे- जिल्हाधिकारी सावन कुमार भंडारा युवा शेतकरी मंचातर्गत कार्यशाळा

16 Oct 2026, 12:02 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
युवा शेतकऱ्यांनी कृषी उद्योगाकडे वळावे- जिल्हाधिकारी सावन कुमार भंडारा युवा शेतकरी मंचातर्गत कार्यशाळा - भंडारा, महाराष्ट्र

युवा शेतकऱ्यांनी कृषी उद्योगाकडे वळावे- जिल्हाधिकारी सावन कुमार
भंडारा युवा शेतकरी मंचातर्गत कार्यशाळा

विलास केजरकर भंडारा.

भंडारा- : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायाबाबत नवीन पिढीमध्ये उदासीनता निर्माण होत असली, तरी पारंपरिक शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन कृषी क्षेत्रात उद्योग उभारल्यास युवा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध होता येईल. यासाठी युवा शेतकरी मंचाच्या माध्यमातून मार्गदर्शन, कृतीशीलता आणि आव्हानात्मक नवीन प्रयोग करण्याची मानसिकता विकसित होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले.
ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने भंडारा युवा शेतकरी मंचांतर्गत संताजी मंगल कार्यालय येथे एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यशाळेत युवा शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय, कृषी प्रक्रिया, मूल्यवर्धन, मत्स्यपालन, सेंद्रिय शेती आणि शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

*शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक समृद्धी*

पशुसंवर्धन विभागाचे डॉ. अनिरुद्ध पाठक यांनी दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालन या शेतीपूरक व्यवसायांमधील आधुनिक तंत्रज्ञान तसेच शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
भंडारा जिल्ह्यातील युवा उद्योजक अनंत इखार यांनी मशरूम उत्पादनाच्या माध्यमातून उभारलेल्या उद्योगाची यशोगाथा सादर केली. दोन लाख रुपयांच्या भांडवलातून सुरू केलेल्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आज दोन कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या यशस्वी प्रवासाने उपस्थित युवा शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची प्रेरणा दिली.

*शासकीय योजनांची माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन*

जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने उपव्यवस्थापक कुणाल गोंडचवर यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत युवकांना उद्योग व रोजगारासाठी प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी तज्ज्ञ सुधीर धकाते यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन केले. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पल्लवी पाकमोडे यांनी मत्स्यपालन व मत्स्य संवर्धनासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच माशांपासून लोणचे आणि इतर व्यावसायिक उत्पादने तयार करून त्यांची विक्री करण्याच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा संसाधन व्यक्ती व प्रशिक्षक योगराज वाघमारे यांनी कृषी प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि शेतमाल विक्री व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

*नवीन प्रयोगांसाठी युवा शेतकरी मंचाची भूमिका महत्त्वाची*

युवा शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावेत, कृषी प्रक्रिया उद्योग उभारावेत आणि शेतमालाला मूल्यवर्धनाची जोड द्यावी, या उद्देशाने भंडारा युवा शेतकरी मंचाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी दिली.
यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक वर्षा चिखले विभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिधमारे, उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रीकर आणि जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व युवा शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कृषी अधिकारी वृषाली देशमुख व प्रास्ताविक संगीता माने यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी अधिकारी प्रगती शेळके यांनी केले.
[16/10, 06:51] devashishtokekar05: **All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Nagpur16 Oct

धर्मचक्र प्रवर्तन दिन के लिए- अजनी रेलवे-स्टेशन पर कुछ ट्रेनों का अस्थाई रूप से ठहराव रहेगा

प्राप्त हुई जानकारी के अनुसार धर्मचक्र प्रवर्तन दिन पर नागपुर पहुंचने वाले यात्रियों की सुविधा के लिए मध्य…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Nagpur16 Oct

अब बाजारों , दुकानों में धनिया , मिर्च, हल्दी, गर्म मसालों के पावडर बिना पैकिंग के खुले में बेचने की अनुमति नहीं होगी

महाराष्ट्र राज्य खाद्य औषधि प्रशासन/ एनडीए, ने अब राज्य के बाजारों, दुकानों में खुले मसालों, हल्दी,मिर्च, धनिया, पावडर,…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Nagpur16 Oct

चुनाव आयोग ने 17राज्यों और केंद्र शासित प्रदेश शोध में वोटर लिस्ट स्पेशल रिवीजन कराने का आदेश दिया है

प्राप्त हुई ताजा जानकारी के अनुसार केंद्रीय चुनाव आयोग कल 15 अक्टूबर को देश के 17 राज्यों और…

पूरी खबर पढ़ें →
भाग 6 ते 10 *चढ-उतार : एका आयुष्याची कहाणी* – *-धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर* 🪶 *प्रकरण ६ : पैशाची किंमत आणि स्वाभिमानाचे धडे*
बेशिस्त वाहनचालकांवर आता ‘एआय’ रडारची नजर! अत्याधुनिक एमटीईएस (MTES) वाहन दाखल; नियम मोडल्यास होणार थेट ई- चलन!
Bhandara16 Oct

बेशिस्त वाहनचालकांवर आता ‘एआय’ रडारची नजर! अत्याधुनिक एमटीईएस (MTES) वाहन दाखल; नियम मोडल्यास होणार थेट ई- चलन!

बेशिस्त वाहनचालकांवर आता ‘एआय’ रडारची नजर! अत्याधुनिक एमटीईएस (MTES) वाहन दाखल; नियम मोडल्यास होणार थेट ई- चलन! विलास…

पूरी खबर पढ़ें →
इमाव, विमाप्र व विजाभज विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी सुरू; ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
Bhandara16 Oct

इमाव, विमाप्र व विजाभज विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी सुरू; ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

इमाव, विमाप्र व विजाभज विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी सुरू; ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत विलास केजरकर भंडारा. भंडारा, दिनांक १५…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!