पूजा अमित घरामी यांच्या सत्यप्रतिज्ञापत्राची न्यायालयाकडून दखल; पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी

पूजा अमित घरामी यांच्या सत्यप्रतिज्ञापत्राची न्यायालयाकडून दखल; पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी
गडचिरोली : पेंढरी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 39/2026 च्या तपासाबाबत सौ. पूजा अमित घरामी यांनी मा.
मुख्य न्याय दंडाधिकारी, गडचिरोली यांच्या न्यायालयात सादर केलेल्या सत्यप्रतिज्ञापत्राची न्यायालयाने दखल घेतली असून, या प्रकरणात पुढील सुनावणीसाठी १९ नोव्हेंबर २०२६ ही तारीख निश्चित केली आहे. विवाहानंतर सासरी मानसिक त्रास व कौटुंबिक छळाला सामोरे जावे लागल्याची तक्रार करणाऱ्या पूजा घरामी यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.
प्रकरणाशी संबंधित दूरध्वनी संभाषणांचे रेकॉर्डिंग, व्हॉइस रेकॉर्डिंग, CCTV फुटेज आणि पेनड्राइव्हमधील डिजिटल पुराव्यांची कायदेशीर व तांत्रिक पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रतिज्ञापत्रात १२, १५, १६, १७ व १८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या विविध दूरध्वनी संभाषणांचा उल्लेख करण्यात आला आहे.
तसेच २५ जून आणि १९ जुलै २०२६ रोजी PSI लोखंडे यांच्याशी झालेल्या संभाषणांमध्ये मानसिक त्रास व तडजोडीच्या प्रयत्नांबाबत माहिती दिल्याचे नमूद आहे. CCTV फुटेज आणि डिजिटल पुराव्यांचा मुद्दा ऐरणीवर
३ जून २०२६ रोजी गोविंद रॉय यांच्या ठिकाणच्या CCTV फुटेजबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
संबंधित फुटेज उपलब्ध होते का, ते जतन किंवा जप्त करण्यासाठी प्रयत्न झाले का आणि त्याचा तपासात विचार करण्यात आला का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय १ ते ३ ऑगस्ट २०२६ दरम्यान SDPO कार्यालयाशी संबंधित घडामोडींच्या नोंदी व व्हॉइस रेकॉर्डिंगची पडताळणी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीबाबतही प्रश्न
या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित PSI लोखंडे, PSI अश्विनी पाटील आणि PSI संदीपकुमार तरम यांच्या कार्यवाहीचा तपशील मागविण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदाराने सादर केलेल्या पुराव्यांची नोंद झाली का, त्यांची तपासणी करण्यात आली का आणि तपास अधिकाऱ्यांमध्ये बदल का झाले, याबाबत स्पष्टता मिळावी, अशी भूमिका प्रतिज्ञापत्रात मांडण्यात आली आहे.
१९ नोव्हेंबरकडे लक्ष
पूजा अमित घरामी यांनी न्यायालयाकडे सर्व उपलब्ध पुराव्यांची निष्पक्ष तपासणी करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. न्यायालयाने प्रतिज्ञापत्राची दखल घेत पुढील सुनावणीसाठी १९ नोव्हेंबर २०२६ ही तारीख दिल्याने या प्रकरणाच्या पुढील न्यायालयीन कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“माझे म्हणणे स्वतंत्रपणे ऐकून घेतले जावे, उपलब्ध पुराव्यांची निष्पक्ष पडताळणी व्हावी आणि मला न्याय मिळावा,” अशी अपेक्षा पूजा अमित घरामी यांनी व्यक्त केली आहे. – डॉ.
पिंटू दयाळ पाल
स्वतंत्र भारत पक्ष – शेतकरी संघटना
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।







