येनापूर–जयरामपूर परिसरातील १३ गावांच्या शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणाविरोधात तीव्र एल्गार!
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


चामोर्शी तालुका
येनापूर–जयरामपूर परिसरातील १३ गावांच्या शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणाविरोधात तीव्र एल्गार! शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ – महिला शेतकऱ्यांचा निर्धार
गडचिरोली : येनापूर–जयरामपूर परिसरातील १३ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या अधिग्रहणाच्या प्रश्नावर आता शेतकरी आक्रमक झाले असून, आपल्या हक्काच्या जमिनी वाचवण्यासाठी महिला व पुरुष शेतकरी एकजुटीने रस्त्यावर उतरले आहेत.
या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी महिला भारती ताईंनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, "गडचिरोलीमध्ये आमच्या मदतीसाठी पुढे येणारा एकही नेता नाही.
आम्ही आमच्या ताकदीवर लढत आहोत. आमची जमीन आणि आमचे हक्क वाचवण्यासाठी आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागत आहे."
शेतकऱ्यांचा सवाल आहे की, त्यांच्या पिढ्यान्पिढ्यांच्या जमिनींचा निर्णय घेताना शेतकऱ्यांना विश्वासात का घेतले जात नाही?
विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा आधार हिरावून घेण्याचा प्रयत्न का केला जात आहे? शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
1.
संबंधित १३ गावांतील जमीन अधिग्रहणाबाबतची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी. 2.
शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही सक्तीची कारवाई करू नये. 3.
जमीन अधिग्रहणासंबंधी सर्व कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी. 4.
शेतकऱ्यांना योग्य मोबदला, पुनर्वसन आणि कायदेशीर हक्कांची हमी द्यावी. 5.
शेतकऱ्यांच्या हरकती व मागण्यांवर लेखी स्वरूपात निर्णय द्यावा. आमचा लढा कोणत्याही विकासाच्या विरोधात नाही; मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी, हक्क आणि भविष्य उद्ध्वस्त करून होणारा विकास आम्हाला मान्य नाही.
प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांची जमीन, शेतकऱ्यांचा अधिकार! जमीन वाचवा, शेतकरी वाचवा!
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

लखीमपुर खीरी। धनतेरस एवं आगामी दीपावली पर्व को शांतिपूर्ण, सुरक्षित और सौहार्दपूर्ण वातावरण में संपन्न कराने के लिए…
पूरी खबर पढ़ें →
दीपावली रोशनी का पर्व, साल भर का सबसे बड़ा त्योहार होता है।दीपावली प्रतिवर्ष कार्तिक मास अमावस्या तिथि के…
पूरी खबर पढ़ें →
बस्ती: नगर थाने की कार्यशैली पर उठे गंभीर सवाल, न्याय के लिए पीड़ितों को खटखटाना पड़ रहा है…
पूरी खबर पढ़ें →
*जनता टैक्स चुकाए और जिम्मेदार मिट्टी में दबा दें विकास! गैवीनाथ स्टेडियम से कृषि मंडी तक उठे सवाल,…
पूरी खबर पढ़ें →
*जनता टैक्स चुकाए और जिम्मेदार मिट्टी में दबा दें विकास! गैवीनाथ स्टेडियम से कृषि मंडी तक उठे सवाल,…
पूरी खबर पढ़ें →
Parveen Singh Manhas District Reporter Pathankot Punjab Vande Bharat news 07 Nov 2026 Sabhi ko Diwali ki shubhkamnaye
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।