Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Ahmednagar

राजकीय मुत्सद्देगिरीचा सर्वोच्च आविष्कार; सुजय विखे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी!

12 Nov 2026, 03:07 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
राजकीय मुत्सद्देगिरीचा सर्वोच्च आविष्कार; सुजय विखे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी! - अहमदनगर, महाराष्ट्र

विखे-थोरात-गडाख-राम शिंदे यांना एकाच व्यासपीठावर आणण्यात सुजय विखेंची खेळी यशस्वी; जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड, उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख

अहिल्यानगर : जिल्ह्याच्या राजकारणात परस्परविरोधी विचारांचे प्रवाह एकत्र आणत सहकाराच्या माध्यमातून नवे राजकीय समीकरण उभे करण्याची किमया साधणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या राजकीय रणनीतीवर अखेर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीने शिक्कामोर्तब झाले आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील यांची एकमताने निवड झाली असून, उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची वर्णी लागली आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील विखे, थोरात, गडाख आणि राम शिंदे या चार प्रभावी नेतृत्वांना सहकाराच्या एका व्यासपीठावर आणण्यात सुजय विखे यांनी बजावलेली समन्वयाची भूमिका या निवडीचे सर्वाधिक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.

राजकीय वैर बाजूला, सहकारासाठी एकत्र!

अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे आणि थोरात हे दोन परस्परविरोधी राजकीय प्रवाह अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यात गडाख यांची स्वतंत्र राजकीय भूमिका आणि प्रा. राम शिंदे यांचे राजकीय वजन लक्षात घेता या सर्व नेतृत्वांना एका सहकाराच्या व्यासपीठावर आणणे हे मोठे आव्हान होते. मात्र, राजकीय मतभेदांपेक्षा सहकार क्षेत्राचे हित महत्त्वाचे मानत डॉ. सुजय विखे यांनी संवाद आणि समन्वयाची भूमिका स्वीकारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून आकाराला आलेल्या या प्रक्रियेतून सहकार विकास आघाडीची बांधणी झाली. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक केवळ संचालकपदांची लढाई न राहता जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारी ठरली.

१७ जागांपासून २० संचालकांच्या पाठिंब्यापर्यंत!

जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने १७ जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतर अकोलेच्या अपक्ष संचालिका संजीवनी शिंदे यांनी आघाडीला पाठिंबा दिल्याने संख्याबळ १८ वर पोहोचले. निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे यांच्या गटातील सचिन घुमरे आणि ज्योती प्रकाश शिंदे यांनीही डॉ. विखे आणि रणजितसिंह देशमुख यांना पाठिंबा दिला. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.

कारखान्यापासून जिल्हा बँकेपर्यंत नेतृत्वाचा विस्तार!

विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा अनुभव असलेल्या डॉ. सुजय विखे यांच्याकडे आता जिल्ह्यातील महत्त्वाच्या वित्तीय सहकारी संस्थेचे नेतृत्व आले आहे. शेतकऱ्यांचे पीककर्ज, विकास सोसायट्यांची आर्थिक स्थिती, सहकारी संस्थांना वित्तपुरवठा, थकबाकी वसुली आणि बँकेची आर्थिक शिस्त या विषयांवर त्यांना काम करावे लागणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा बँकेला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचे मोठे आव्हान नव्या नेतृत्वासमोर असेल.

राजकीय समीकरण जुळले; आता सहकाराला बळ देण्याची कसोटी!

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून पक्षीय संघटनेत काम करत असताना जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातही डॉ. सुजय विखे यांनी आपला प्रभाव वाढविला आहे. वेगवेगळ्या राजकीय विचारांच्या नेत्यांना एकत्र आणण्याची रणनीती आणि सहकारी संस्थेचे नेतृत्व करण्याचा अनुभव या दोन्हींचा कस आता जिल्हा बँकेच्या कारभारात लागणार आहे. राजकीय समन्वयातून मिळालेल्या यशाचे रूपांतर शेतकरीहिताच्या निर्णयांत आणि बँकेच्या आर्थिक प्रगतीत कितपत होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

डॉ. सुजय विखे पाटील अध्यक्षपदी आणि रणजितसिंह देशमुख उपाध्यक्षपदी विराजमान झाल्याने जिल्हा बँकेच्या नेतृत्वात नवा अध्याय सुरू झाला असून, सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात आकाराला आलेल्या नव्या समीकरणांची ही महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

सहारनपुर में साइबर सुरक्षा को लेकर बड़ा जागरूकता कार्यक्रम, आशा मॉडर्न स्कूल में छात्रों को बताए ऑनलाइन ठगी से बचने के तरीके
Saharanpur12 Nov

सहारनपुर में साइबर सुरक्षा को लेकर बड़ा जागरूकता कार्यक्रम, आशा मॉडर्न स्कूल में छात्रों को बताए ऑनलाइन ठगी से बचने के तरीके

🚨🔥 **बड़ी खबर | सहारनपुर में साइबर सुरक्षा को लेकर बड़ा जागरूकता कार्यक्रम, आशा मॉडर्न स्कूल में छात्रों…

पूरी खबर पढ़ें →
12 साल के बच्चे का अपहरण कर हत्या:मिर्जापुर में 60 लाख में जमीन बेची तो मांगी 30 लाख की फिरौती; आरोपी एनकाउंटर में गिरफ्तार
Mirzapur12 Nov

12 साल के बच्चे का अपहरण कर हत्या:मिर्जापुर में 60 लाख में जमीन बेची तो मांगी 30 लाख की फिरौती; आरोपी एनकाउंटर में गिरफ्तार

विंध्याचल थाना क्षेत्र में 12 साल के एक बच्चे के अपहरण और हत्या के मामले में पुलिस ने…

पूरी खबर पढ़ें →
मिर्जापुर में तीसरी रेल-लाइन के निर्माण के दौरान धंसी मिट्टी:डाउन लाइन पर ट्रेनों का संचालन बंद, सात का रूट बदला
Mirzapur12 Nov

मिर्जापुर में तीसरी रेल-लाइन के निर्माण के दौरान धंसी मिट्टी:डाउन लाइन पर ट्रेनों का संचालन बंद, सात का रूट बदला

मिर्जापुर में रेलवे स्टेशन और झिंगुरा रेलखंड के बीच तीसरी रेल लाइन के निर्माण के दौरान मंगलवार शाम…

पूरी खबर पढ़ें →
मसानी से हैदराबाद तक जतिन का वैज्ञानिक सफर, इसरो भ्रमण के लिए हरियाणा के 48 विद्यार्थियों में शामिल
Rewari12 Nov

मसानी से हैदराबाद तक जतिन का वैज्ञानिक सफर, इसरो भ्रमण के लिए हरियाणा के 48 विद्यार्थियों में शामिल

(रेवाड़ी)(सुरेश सिहाग )विद्यार्थियों में वैज्ञानिक सोच एवं अंतरिक्ष विज्ञान के प्रति रुचि विकसित करने के उद्देश्य से समग्र…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!