चंद्रपूर मर्डर केस मध्ये मोठा खुलासा! पोलिसांचे अधिकृत बयान – घातपात नाही!
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६ | NEED 24 मराठी न्यूज
चंद्रपूर मर्डर केस मध्ये मोठा खुलासा! पोलिसांचे अधिकृत बयान – घातपात नाही!
चंद्रपूर / प्रियदर्शनी चौक : सोशल मीडियावर चंद्रपूर मर्डर केस म्हणून व्हायरल होत असलेल्या प्रकरणावर पोलिसांनी अखेर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.
आज सकाळी ८ ते साडेआठच्या दरम्यान ११२ वर माहिती मिळाली की, प्रियदर्शनी चौक येथे एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला आहे. माहिती मिळताच पोलीस टीम घटनास्थळी पोहोचली. शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांसमोर पंचनामा करण्यात आला.
घटनास्थळाच्या आजूबाजूला पाहणी करताना रेल्वे ट्रॅक जवळ उर्वरित भाग मिळून आला.
पोलीस स्टेशन रामनगर येथे १३ तारखेला दाखल असलेल्या मिसिंग तक्रारीशी मृतदेहाचे आणि कपड्यांचे वर्णन जुळत होते. त्यानुसार नातेवाईकांना बोलावून मृतदेह दाखवण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली.
मृत व्यक्तीचे नाव : प्रभात सरकार, अंदाजे वय ६५ वर्षे, रा. बंगाली कॅम्प
१३ तारखेला ते घरातून निघून गेले होते, त्यानंतर ते मिळून आले नव्हते. त्यांना ऐकण्याचा, बोलण्याचा आणि मानसिक आजार असल्याची प्राथमिक माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतदेहावर घातपात दर्शवणाऱ्या कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत.
सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, प्राथमिकदृष्ट्या या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा घातपात निष्पन्न झालेला नाही. मृतदेहाची ओळख पटली असून पुढील तपास सुरू आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. Dr.pintu Paul Paul Distric Repoter
–
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

लखनऊ। सहारा इंडिया परिवार, साईं प्रसाद ग्रुप, पल्स कंपनी सहित विभिन्न चिटफंड कंपनियों में निवेश करने वाले लाखों-करोड़ों…
पूरी खबर पढ़ें →
कटनी-शहडोल मार्ग पर भीषण सड़क हादसा: दो बसों की चपेट में आई बाइक, दो छात्रों की दर्दनाक मौत,…
पूरी खबर पढ़ें →
बाघमारा। पंचायत चुनाव से पहले इलाके में सियासी सरगर्मी तेज हो गई है। आरोप-प्रत्यारोप के बीच मंदरा पंचायत…
पूरी खबर पढ़ें →
रेवाड़ी( सुरेश सिहाग )पुलिस अधीक्षक रेवाड़ी श्री हेमेंद्र कुमार मीणा, आईपीएस के कुशल निर्देशन में नशीले पदार्थों की…
पूरी खबर पढ़ें →
सुमिता शर्मा चंद्रपूर महाराष्ट्र : राज्य के मान्यता प्राप्त गैर-अनुदानित (निजी) स्कूलों में प्रवेश प्रक्रिया, फीस वसूली और…
पूरी खबर पढ़ें →
बेटियों के जन्म पर गर्व जताने वाली माताओं का सम्मान, नवजात बच्चियों को भेंट किए उपहार समाज सेवा…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।