स्मार्ट मीटरने लोकांचं जगणं कठीण केलं! विधानसभेत विजय वडेट्टीवार यांचा सरकारला घेराव
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६ | NEED 24 मराठी न्यूज
स्मार्ट मीटरने लोकांचं जगणं कठीण केलं! विधानसभेत विजय वडेट्टीवार यांचा सरकारला घेराव
मुंबई / नागपूर : स्मार्ट मीटरच्या संदर्भात जी काही बोंबाबोंब आहे, ती अत्यंत गंभीर आहे. प्रत्येक माणूस वैतागलेला आहे, असं विधानसभेत काँग्रेस नेते श्री. विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
माजी आमदार गिरीश व्यास यांनाही स्मार्ट मीटरमुळे जास्त बिल आलं, त्यांनीच तक्रार दिली, असं वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितलं.
ते म्हणाले – "एकीकडे लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देतो, पण इलेक्ट्रिक बिल एका-एका घरामध्ये पाच-पाच हजारांनी वाढवून दिलाय या स्मार्ट मीटरनी. लोकांचं जगणं कठीण केलंय."
"मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं, आम्ही कोणालाही सक्ती करणार नाही. पण ऊर्जा विभागाचे, विद्युत विभागाचे अधिकारी जाऊन जबरदस्तीनं मीटर लावण्याचं काम करत आहेत. मीटर ज्या पद्धतीनं फिरतोय, त्या पद्धतीनं लोकांची डोकी फिरताहेत," असा घणाघात त्यांनी केला.
"आम्हाला २८-३० हजारांचं बिल येत होतं. काल परवा घरी गेलो, दीड लाखाचं बिल आलंय स्मार्ट मीटर लावल्यानंतर," असं सांगत त्यांनी सभागृहात खळबळ उडवून दिली.
"तीन हजारात बनतो, आणि बावीस हजार रुपये तर अदानीच्या घशात घालण्याचं काम चालू झालंय," असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
स्मार्ट मीटरच्या संदर्भात जी आकडेवारी पुढे आली आहे, त्याची चौकशी करा आणि या लोकांना यातून मुक्ती द्या, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली.
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

अज्ञात वाहन की टक्कर से युवक गंभीर घायल, जिला अस्पताल कटनी रेफर नेगवां के पास हुआ सड़क हादसा,…
पूरी खबर पढ़ें →
ईंट लदे ट्रर्बो ट्रक ने 12 वर्षीय छात्र को कुचला,मौके पर मौत।। "स्कूटी से नानी के घर जा…
पूरी खबर पढ़ें →
विजय चौक में बंदरों के झुंड से जनजीवन प्रभावित, लोग घरों में रहने को मजबूर; सुरक्षित स्थान पर…
पूरी खबर पढ़ें →
मोहम्मदाबाद तहसील क्षेत्र में किसानों द्वारा पुवाल जलाने की मनमानी जारी है, जबकि इस पर पाबंदी लगी हुई…
पूरी खबर पढ़ें →
थाना परिसर से लेकर मालखाना, शस्त्रागार और महिला हेल्प डेस्क का किया निरीक्षण, लंबित मामलों के त्वरित निस्तारण…
पूरी खबर पढ़ें →
पंचायत के नाली निर्माण कार्य के बोर्ड पर निजी दुकान का विज्ञापन! खर्च विवरण मिटाने का आरोप, अरेकेल…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।